Aaditya L-1 : कधी पोहचणार इस्रो प्रमुखांनी दिली अपडेट

आदित्य एल-1' सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे यान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे.

126
Aaditya L-1 : कधी पोहचणार इस्रो प्रमुखांनी दिली अपडेट
Aaditya L-1 : कधी पोहचणार इस्रो प्रमुखांनी दिली अपडेट

भारताची पहिली सौर मोहीम ‘आदित्य एल-1’आता नेमक्या कुठल्या टप्प्यात पोहचली आहे. याच संदर्भात माहिती देताना इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली. तर पीटीआयशी बोलताना सांगितले. तर आदित्य यान अगदी सुस्थितीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Aaditya L-1)

‘आदित्य एल-1’ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे यान पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे. हा पॉईंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे. या ठिकाणाहून आदित्य यान चोवीस तास सूर्याचा अभ्यास करू शकणार आहे. (Aaditya L-1)

(हेही वाचा :Sanjay Raut यांच्या ट्विटमुळे इस्त्रायल नाराज; थेट पत्र पाठवून मोदी सरकारकडे केली तक्रार!)

2 सप्टेंबर रोजी आदित्य यानाचे प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यानंतर काही दिवसांनी आदित्यने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून एल-1 पॉईंटकडे प्रवास सुरू केला होता. 29 ऑक्टोबर रोजी आदित्य यानावर असणाऱ्या हाय एनर्जी एल-1 ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्टोमीटरने सोलार फ्लेअर डिटेक्ट करुन त्यांचे रेकॉर्डिंग केले होते.तर आदित्य यान कधी पोहोचणार याबाबत देखील सोमनाथ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की सर्व क्रियाकल्प पार पाडून आदित्य यान हे 7 जानेवारी 2024 रोजी एल-1 पॉइंटवर पोहोचू शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.