RBI ने तीन मोठ्या बँकांवर ठोठावला दंड; कोणत्या आहेत ‘त्या’ बँका?

151
Repo Rate : २०२५ पर्यंत रेपो दरात कपातीची शक्यता नाहीच

RBI ने एक मोठी कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही महत्वाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे . या बँकांमध्ये सिटी बँक बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचा समावेश आहे.

किती ठोठावला दंड?

रिझर्व्ह बँकेने (RBI) ने सिटी बँकेला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर बँक ऑफ बडोदाला ४.३४ कोटी रुपये आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या वेगवेगळ्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ (बीआर कायदा) चे उल्लंघन आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सिटी बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे.बँक ऑफ बडोदाला लार्ज कॉमन एक्सपोजरशी संबंधित केंद्रीय राखीव निधीच्या निर्मितीशी संबंधित काही निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल ४.३४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे दुसर्‍या निवेदनात म्हटले आहे. चेन्नईच्या इंडियन ओव्हरसीज बँकेला कर्ज आणि अॅडव्हान्सशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

(हेही वाचा Israel-Hamas Conflict: हमासने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या २४ जणांना इस्रायलला पाठवले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.