Tipu Sultan : टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांना तुरुंगात टाका; मिलिंद एकबोटेंची पंतप्रधानांकडे मागणी

144

राज्यात टिपू सुलतानची (Tipu Sultan) जयंती साजरी करण्यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. या वादात आता समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी उडी घेतली आहे. टिपू सुलतान वा रावणाची जो कुणी जयंती साजरी करेल, त्याला तुरुंगात टाका नाहीतर पाकिस्तानला पाठवा, अशी मागणी मिलिंद एकबोटे यांनी थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

देशाचे पंतप्रधान यांच्याकडे पाठपुरावा करणार

जे लोक आपल्या राज्यात आणि देशात टिपू सुलतानची (Tipu Sultan) जयंती साजरी करतात, अशा लोकांना आपण पाकिस्तानमध्ये पाठवायला हवे, त्यासाठी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्यास दावा कट्टर हिंदुत्ववादी नेते तसेच समस्थ हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केल आहे. ज्या टिपू सुलतानाने (Tipu Sultan) हजारो हिंदूंची कत्तल केली, अशा टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांना आपण पाकिस्तानला पाठवायला हवे आणि पुढें पाकिस्तान आपल्या ताब्यात आल्यावर आपन टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू असा विश्वासदेखील मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा RBI ने तीन मोठ्या बँकांवर ठोठावला दंड; कोणत्या आहेत ‘त्या’ बँका?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.