Chine : चीनमध्ये पसरतोय भयंकर आजार; लहान बालके मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल

147

Covid सारख्या महाभयंकर साथीचा उगम ज्या चीन (Chine) मध्ये झाला होता, त्याच चीनमध्ये आता श्वसनासंबंधीच्या भयंकर आजाराचा प्रसार होऊ लागला आहे. याची जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर दखल घेतली आहे. हा आजार लहान मुलांना होत आहे.

चीनच्या  (Chine) स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या गूढ आजारामुळे चीनची राजधानी बीजिंगमधील आणि 500 मैलांच्या परिघातील सर्व रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहेत. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याचा त्रास झालेल्या मुलांमध्ये फुफ्फुसात जळजळ, तीव्र ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे दिसून येत आहेत.

(हेही वाचा PM Narendra Modi यांचे Tejas मधून उड्डाण; म्हणाले, माझा आत्मविश्वास खूप वाढला)

आजार महामारी आहे का?

चीन  (Chine) मधील न्यूमोनियाबाबत जगभरातील अलर्ट जारी केला आहे. हा आजार कधी पसरू लागला हे अद्याप कळलेले नाही. हा आजार फक्त लहान मुलांपुरता मर्यादित आहे की तरुण आणि वृद्धांवरही त्याचा परिणाम होत आहे हेही अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या आठवड्यात, चीन  (Chine) च्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने न्यूमोनिया पसरण्याचे कारण म्हणून कोरोना निर्बंध उठवण्याचे कारण दिले होते. WHO ने या आजाराची तपासणी करण्यासाठी चीनमध्ये सध्या पसरणाऱ्या सर्व प्रकारच्या विषाणूंची यादी मागवली आहे. त्याच वेळी, लोकांना मास्क घालण्यास आणि सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले आहे. हा रहस्यमय आजार महामारी आहे की नाही याबाबत WHO ने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.