राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना २१ एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी पवारांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे शरद पवार यांच्यावर 21 दिवसांत तिसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाली आहे.
नवाब मलिक यांची ट्विटरवरून माहिती
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अॅडमिट झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे, असे ट्विट मलिकांनी केले आहे. यापूर्वी त्यांच्यावर 12 एप्रिलला पित्ताशयावर यशस्वीपणे पार पडली होती. त्याआधी 30 मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. 30 मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर 12 एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली.
(हेही वाचा : पुन्हा नगरसेवक निधी कोरोनासाठी? ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची नगरसेवकांकडून मागणी)
काय होता नेमका त्रास!
शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे तयार झाले होते. हे खडे जर का पित्त नलिकेमध्ये आले आणि नलिकेच्या तोंडाशी अडकले तर परिस्थिती थोडी चिंताजनक होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता. त्याच्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी त्यावेळी घेतला होता.
Join Our WhatsApp Community