Winter : काश्मिरात पारा शून्याच्या खाली; देशभरात थंडी वाढणार; पावसाचेही संकेत

123

काश्मिरात पारा सध्या शून्याच्या खाली आला आहे. त्याचा फटका म्हणून देशभरात थंडी वाढणार आहे, तसेच पावसाचाही संकेत मिळत आहेत. वातावरणात थंडी वाढल्याने येत्या २४ तासांत जम्मू-काश्मीरसह सात राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात थंडी वाढणार आहे.

हलक्या पावसासह हिमवर्षाव होऊ शकतो

स्कायमेटच्या मते, जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादच्या वरच्या भागात हलक्या पावसासह हिमवर्षाव होऊ शकतो. गेल्या 15 दिवसांत पहिल्यांदाच गुरुवारी काश्मीरमधील पारा 40.9 अंशांच्या वर राहिला. पहलगाम आणि अनंतनाग येथे उणे 3.3 अंशांसह सर्वात थंडीची नोंद झाली. तर गुलमर्गमध्ये उणे दोन अंश तापमानाची नोंद झाली. बांदीपोरा, बारामुल्ला, गंदरबल, कोकरनाग, कुलगाम, कुपवाडा या भागात तापमान शून्य ते 1.7 अंशांच्या दरम्यान राहिले. थंडीसोबतच दिल्लीतही धुके वाढू लागले आहे. राजधानी दिल्लीतील हवेने शुक्रवारी पुन्हा एकदा धोकादायक पातळी गाठली आहे. राजधानीचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 388 होता. अनेक भागांत AQI 400च्या पुढे नोंदवला गेला. पुसा येथे 403, आयआयटी दिल्लीमध्ये 579, लोधी रोड परिसरात 359 एक्यूआय नोंदवले गेले.

(हेही वाचा Chine : चीनमध्ये पसरतोय भयंकर आजार; लहान बालके मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.