सध्या राज्यात विविध आरक्षणाचा (Reservation) समाजाच्या आरक्षणाचा विषय पेटलेला आहे. त्यामुळे विविध समाजात एकमेकांप्रती संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशा वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र वेगळेच विधान केला आहे. ज्यांना आरक्षणाचा (Reservation) लाभ झाला आहे, त्यांनी आरक्षण सोडून दिले पाहिजे. माझे आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना या विषयांबाबत पक्षापेक्षा वेगळे आहे, असे महत्वाचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सन 1980 पर्यंत जात हा मुद्दा राज्यात महत्त्वाचा नव्हता, 1985 नंतर मात्र परिस्थिती बदलली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर चालायचे हे मला अजिबात मान्य नाही. जातीचा आणि आर्थिक विषयाचा काहीही संबंध नाही. पण राज्यात सुरू असलेली परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागते, पुढे काय होईल सांगता येत नाही.आरक्षण (Reservation) देण्याचे सरकारने कबुल केले असेल तर ते त्यांनी द्यायला हव, कायद्याच्या चौकटीत ते कसे बसवायचे हे सरकारने ठरवावे. जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंतच आरक्षण वापरले पाहिजे, नंतर सोडले पाहिजे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये.
Join Our WhatsApp Community