जे. जे. रुग्णालय (J J Hospital) इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या स्त्रीरोग विभागातील शस्त्रक्रियागृह नूतनीकरणाच्या कामामुळे सोमवार, २७ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, या विभागाच्या महत्त्वाच्या, आपत्कालिन शस्त्रक्रिया आणि प्रसुती वगळता अन्य शस्त्रक्रिया नूतनीकरणाचे काम सुरू असेपर्यंत करण्यात येणार नाहीत.
(हेही वाचा – MHADA : जीआयएस यंत्रणेच्या मदतीने मिळणार म्हाडाच्या भूखंडाची माहिती)
प्रसूतीच्या शस्त्रक्रिया ‘या’ रुग्णालयाकडे हस्तांतरित
रुग्णालयातील प्रसूती शस्त्रक्रियागृह (Maternity surgery) सुरू होईपर्यंत आजघडीला स्त्रीरोग विभागासाठी एकच शस्त्रक्रियागृह आहे. या शस्त्रक्रियागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असेपर्यंत रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी व त्यांचा त्रास कमी करण्यासाठी स्त्रीरोग विभागातील काही निवडक व महत्त्वाच्या आणि कमी धोका असलेल्या प्रसूतीच्या शस्त्रक्रिया कामा रुग्णालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. (J J Hospital)
तसेच आपत्कालिन परिस्थितीमध्ये येणाऱ्या प्रसूतीच्या व अन्य महत्त्वाच्या शस्त्रक्रियांसाठी बाळाराम इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तात्पुरत्या स्वरुपाचे शस्त्रक्रियागृह सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती असलेल्या रुग्णाची व प्रसूतीची कोणतीही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार नाही. तसेच गरज असल्याशिवाय ती कामा रुग्णालयाकडे पाठविण्यात येऊ नये, असे परिपत्रक जे. जे. रुग्णालय प्रशासनाने (J J Hospital Administration) जारी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community