Kalyan News : कल्याण मध्ये ११ दिवसांसाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या काय आहेत पर्यायी मार्ग

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुढील दहा दिवस बदल करण्यात आले आहेत.

107
Kalyan News : कल्याण मध्ये ११ दिवसांसाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या काय आहेत पर्यायी मार्ग
Kalyan News : कल्याण मध्ये ११ दिवसांसाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या काय आहेत पर्यायी मार्ग

कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे 14 गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत मध्य रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत गर्डर टाकले जाणार आहेत. या कामासाठी स्मार्ट सिटीसह वाहतूक पोलीस सज्ज झाले असून कामाच्या ठिकाणी कामामध्ये अडथळा निर्माण हाऊ नये, त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुढील दहा दिवस बदल करण्यात आले आहेत. या कामासाठी वाहतूक पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीत मोठा बदल केला आहे. (Kalyan News)

कल्याण पश्चिमेतील वाहतुकीत बदल

– कल्याण वल्ली पीर चौका कडून कल्याण रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वल्लीपीर चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

– या मार्गावरील वाहने गुरुदेव हॉटेल कल्याण रेल्वे स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील .

– भानू सागर टॉकीज कडे जाणारी वाहने बैल बाजार स्मशानभूमी मार्गे इच्छित स्थळी जातील.

– कल्याण रेल्वे स्टेशन कडून वल्लीपूर चौकाकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना साधना हॉटेल व अर्चिस गॅलरी येथे प्रवेश बंद करण्यात आला. (Kalyan News)

(हेही वाचा : Devendra Fadnavis : कमळा सोबत वाघ ;’त्या’ फोटोवर काय म्हणाले फडणवीस)

– साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावीकडून वळण घेऊन गुरुदेव हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील.

– भानू सागर टॉकीज कडे जाणारी वाहने साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावीकडील बाजूने वळून गुरुदेव हॉटेल चौक बैल बाजार स्मशानभूमी मार्गे इच्छितस्थळी जातील.

अशा पद्धतीने कल्याण पश्चिमेतील वाहतुकीमध्ये पोलीस वाहतूक विभागाने बदल केले असल्याची माहिती दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.