Constitution day : भारतीय संविधान म्हणजेच भारताचा पाया

नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक मूल्यांचे ज्ञान व्हावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

322
Constitution day : भारतीय संविधान म्हणजेच भारताचा पाया
Constitution day : भारतीय संविधान म्हणजेच भारताचा पाया

भारतीय संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आले. (Constitution day)

२०१५ मध्ये डॉ. आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षांना श्रद्धांजली म्हणून भारत सरकारने वर्षभर हा उत्सव साजरा करण्याचे नियोजित केले आणि मे २०१५ मध्ये मुंबईत अशाच एका कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर हा “संविधान दिन” म्हणून घोषित केला.

भारत सरकार या दिवशी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करतं. संविधान दिनानिमित्त भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांमध्ये संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी सभा, भाषणे आणि स्पर्धा भरवल्या जातात. (Constitution day)

नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक मूल्यांचे ज्ञान व्हावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतीय संविधान ही एक लिखित राज्यघटना आहे. संविधान म्हणजे भारत सरकारची रचना आणि तेथील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये निश्चित करणारे दस्तऐवज. हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्यामध्ये २५ भाग, ४४८ कलमे आणि १२ अनुसूची आहेत.

(हेही वाचा : Kalyan News : कल्याण मध्ये ११ दिवसांसाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या काय आहेत पर्यायी मार्ग)

देशाचे रक्षण करणे, संविधानाचे पालन करणे आणि आई-वडिलांचा आदर करणे यासारखी मूलभूत कर्तव्ये तसेच स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आणि समानतेचा अधिकार यासारखे मूलभूत अधिकार – अशाप्रकारचे अधिकार आणि स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिले आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? अधिकार म्हणजे काय? याविषयी मौलिक ज्ञान प्रदान करुन भारतीय नागरिकाला सजग नागरिक बनवणे हा दृष्टीकोन समोर ठेवून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे.भारतीय संविधान म्हणजे भारताचा पाया. चला तर संविधानाच्या रक्षणासाठी आणि संवैधानिक मूल्ये रुजवण्यासाठी सज्ज होऊया.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.