Governor Ramesh Bais : वाचन सुलभता वाढविण्यासाठी पुस्तकांचे डिजिटलायझेशन करा; राज्यपालांचे आवाहन

एशियाटिक सोसायटीचा २१९ वा वर्धापनदिन

132
Governor Ramesh Bais : वाचन सुलभता वाढविण्यासाठी पुस्तकांचे डिजिटलायझेशन करा; राज्यपालांचे आवाहन
Governor Ramesh Bais : वाचन सुलभता वाढविण्यासाठी पुस्तकांचे डिजिटलायझेशन करा; राज्यपालांचे आवाहन

नवी पिढी वाचनापासून दूर जात आहे, हा चुकीचा समज आहे. डिजिटल माध्यमे आल्यामुळे नवी पिढी वाचन सुलभता शोधत आहे. ‘व्यापार सुलभते’प्रमाणेच वाचकांना वाचन सुलभता हवी आहे. ग्रंथ वाचन बंद झाले नाही तर वाचण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटलायझेशन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी केले.

मुंबईचे सांस्कृतिक वैभव असलेल्या एशियाटिक सोसायटीचा (Asiatic Society) २१९ वा वर्धापन दिवस राज्यपाल बैस (Governor Ramesh Bais) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. लाखो दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते, नाणी आणि नकाशांचा संग्रह असलेली एशियाटिक सोसायटी (Asiatic Society) आपल्या अस्तित्वासाठी लढताना दिसत आहे. परंतु मुंबई हे दानशूर लोकांचे शहर आहे. मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून शेकडो अशासकीय संस्था आपल्या सेवाभावी कार्यासाठी मुंबईतून निधी संकलन करीत असतात. त्यामुळे निधीची कमी नाही तर योग्य व्यक्तींकडे योग्य प्रस्तावासह पोहोचणे आवश्यक असल्याचे बैस (Governor Ramesh Bais) यांनी यावेळी सांगितले.

एशियाटिक सोसायटीने (Asiatic Society) राज्यातील सर्व विद्यापीठांसोबत काम करावे. आपल्या भव्य जागेची पुनर्रआखणी करावी आणि युवा वाचकांना साहित्य उपलब्ध करुन द्यावे. जगातील मोठमोठी ग्रंथालये स्वतःला कसे बदलत आहेत याचे अध्ययन करुन आपण त्यानुसार बदल करावे. तसेच युवा पिढीला आणि कॉर्पोरेट सदस्यांना व्यवस्थापनात घ्यावे अशा सूचनाही राज्यपालांनी (Governor Ramesh Bais) यावेळी केल्या.

एशियाटिक सोसायटीला (Asiatic Society) अध्यक्ष म्हणून इतिहासकार, लेखक आणि संपादकांची परंपरा लाभली आहे. सोसायटीने स्वतःचा वार्षिक साहित्य उत्सव निर्माण करावा. संगीत समारोहाचे देखील आयोजन करावे. अनेक देश आज आपल्या देशातील ऐतिहासिक वारशाच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. एशियाटिक सोसायटीने (Asiatic Society) आपले कार्य सुरु ठेवण्यासाठी आपले स्थापत्य आणि ग्रंथ वैभव जगापुढे आणावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

(हेही वाचा – MECB : गोरेगाव मुलुंड रस्ता प्रकल्पाचा मार्ग भांडुपमध्ये ‘एमईसीबी’मुळे अडला)

यावेळी डॉ. सरयू दोशी (भारतीय कला, इतिहास आणि संस्कृती), डॉ. अनुरा मानातुंगा (लेखक आणि क्युरेटर, कला इतिहास), प्रो. नोबुयोशी नामाबे (बुद्धिस्ट स्टडीज), प्रो. गोपाल कृष्ण कान्हेरे (रौप्य पदक) आणि प्रो. ब्रजकिशोर स्वैन (धर्मशास्त्र-महामहोपाध्याय डॉ पां. वा. काणे सुवर्ण पदक) यांना राज्यपालांच्या हस्ते संस्थेची फेलोशिप आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. एशियाटिक सोसायटीचे (Asiatic Society) अध्यक्ष विस्पी बालापोरिया यांनी प्रास्ताविक केले. तर मानद सचिव मंगला सरदेशपांडे यांनी आभार मानले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, सोसायटीच्या उपाध्यक्ष शहरनाज नलवाला, डॉ. फरोख उदवाडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.