Poisar River : पोयसर नदीच्या ‘त्या’ पट्ट्यातील भागाचे रुंदीकरण, हनुमान नगरमधील तुंबणाऱ्या पाण्याची चिंता मिटणार

पोयसर नदीच्या काही भागातील खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी मालाड कुरार कल्व्हर्ट ते कांदिवली पूर्व येथील पश्चिम रेल्वे येथील या नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

214
Poisar River : पोयसर नदीच्या 'त्या' पट्ट्यातील भागाचे रुंदीकरण, हनुमान नगरमधील तुंबणाऱ्या पाण्याची चिंता मिटणार
Poisar River : पोयसर नदीच्या 'त्या' पट्ट्यातील भागाचे रुंदीकरण, हनुमान नगरमधील तुंबणाऱ्या पाण्याची चिंता मिटणार

पोयसर नदीच्या (Poisar River) काही भागातील खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी मालाड कुरार कल्व्हर्ट ते कांदिवली पूर्व येथील पश्चिम रेल्वे येथील या नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुंदीकरणामुळे हनुमान नगर परिसरातील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा होणार आहे.

कांदिवली (पूर्व) येथील कुरार कल्व्हर्ट ते पश्चिम रेल्वे या भागामध्ये हनुमान नगर परिसर हा सखल असल्याने मागील काही वर्षापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होत आहे. याबाबत स्थानिक आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी या भागातील रहिवाश्यांना पावसाळी पाण्यामुळे व पूरसदृष्य स्थितीपासून दिलासा देण्यासाठी उपाययोजना आखण्याची विनंती निवेदनाद्वार महापालिका प्रशासनाकडे (Municipal Administration) केली होती. लोकप्रतिनिधींच्या या वारंवार पत्रव्यवहार व बैठका घेऊन पाठपुरावा केल्यानंतर महापालिका आर/दक्षिण विभागामार्फत पोयसर नदी (Poisar River) लगतच्या काही बाधित झोपडीधारकांना इतरत्र ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करुन बाधित झोपड्यांचे निष्कासन नजीकच्या काळात केलेले आहे. या बाधित झोपड्या तोडण्यात आल्या आहेत. (Poisar River)

या झोपड्या तोडण्यात आल्याने रिकाम्या झालेल्या जागेवर सुमारे ३०० मीटर इतक्या लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे पावसाळ्यात परिसरात पाणी शिरण्यास अटकाव होईल आणि पावसाळ्यात निर्माण होणारी पूरसदृष्य परिस्थिती काही अंशी आटोक्यात येऊन तेथील रहिवाश्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या पोयसर नदीचे (Poisar River) रुंदीकरण करून संरक्षण भिंतीचे बांधकाम या पट्ट्यात करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या (Rainwater Drainage Section) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Sanjay Shirsat : ३१ डिसेंबरनंतर मविआतील मोठे नेते महायुतीत येतील – संजय शिरसाट यांचा दावा)

या कामांसाठी आर्मस्ट्राँग इंडिया कन्स्ट्रक्शन (Armstrong India Construction Company) या कंपनीची निवड करण्यात आली असून या कामासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पोयसर नदीच्या (Poisar River) या भागाचे रुंदीकरण करण्यात येत असल्याने मिलिंद विकास वसाहत सोसायटी, शिवनेरी सेवा मंडळ, गणेश कृपा सोसायटी या दरम्यान ही संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. एकूण ३०० मीटर लांबी या नदीच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या (Rainwater Drainage Section) अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.