प्रा. यश पाल (Scientist Yash Pal) हे भारताचे महान शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (ISRO) च्या प्रसिद्ध युनिट ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर’ (SAC) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६ रोजी झांग (पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर) येथे झाला. त्यांनी १९४९ मध्ये पंजाब विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि १९५८ मध्ये मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून भौतिकशास्त्रात पीएचडी मिळवली. (Scientist Yash Pal)
‘टर्निंग पॉइंट’ या टिव्हीवरील वैज्ञानिक मालिकेतून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांनी या मालिकेचे सुमारे १५० एपिसोड्स होस्ट केले. या मालिकेद्वारे ते प्रेक्षकांना विज्ञानाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत आणि मनोरंजक पद्धतीने द्यायचे. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून (Tata Institute of Fundamental Research) त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
१९७३ मध्ये केंद्र सरकारने त्यांची अहमदाबाद येथे स्थित स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे पहिले संचालक म्हणून नियुक्ती केली. १९८३ ते १९८४ या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे मुख्य सल्लागार आणि १९८४ ते १९८६ या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात सचिव म्हणून काम केले. (Scientist Yash Pal)
१९८६ ते १९९१ दरम्यान ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते. २००७-२०१२ दरम्यान ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू होते. विशेष म्हणजे नवी दिल्ली येथे ‘इंटर-युनिव्हर्सिटी एक्सीलरेटर सेंटर’, पुण्यातील ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स’ आणि ‘इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क’ स्थापन करण्याचे श्रेय प्रा. यश पाल (Scientist Yash Pal) यांना जाते.
(हेही वाचा – Governor Ramesh Bais : वाचन सुलभता वाढविण्यासाठी पुस्तकांचे डिजिटलायझेशन करा; राज्यपालांचे आवाहन)
१९९३ मध्ये भारत सरकारने मुलांच्या शिक्षणातील सुधारणा आणि अभ्यासाचा अधिक भार या विषयावर एक समिती स्थापन केली होती. प्रा. यश पाल (Scientist Yash Pal) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालाचे नाव होते, ’लर्निंग विदाऊट बर्डन.’ यामध्ये त्यांनी मुलांवरील पुस्तकांचे ओझे कमी करून दर्जेदार शिक्षण विकसित करण्यासाठी अनेक सूचना केल्या होत्या. (Scientist Yash Pal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community