वर्गीस कुरियन (Verghese Kurien) यांना धवल क्रांतीचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळमधील एका ख्रिस्ती कुटुंबात झाला. त्यांनी १९४० मध्ये मद्रासच्या लोयोला कॉलेजमधून भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि मद्रास विद्यापीठातून बी.ई. (मेकॅनिकल) अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी ते अमेरिकेत गेले.(Verghese Kurien)
जमशेदपूरमधील टाटा आयर्न अँड स्टील कंपनी इन्स्टिट्यूट आणि बंगळुरू येथील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले. डॉक्टर कुरियन यांच्या नेतृत्वाखाली एनडीडीबी ने ऑपरेशन फ्लड म्हणजे धवल क्रांती सुरु केली. त्यांच्या या क्रांतीमुळे अवघ्या चार वर्षांत भारत जगातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश बनला.
१९६५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (NDDB) ची स्थापना केली. त्यांनी १९७३ मध्ये GCMMF (गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन) ची स्थापना करून त्यांच्या दुग्धशाळेतील उत्पादने विकली. विशेष म्हणजे अमूलची स्थापना डॉ. कुरियन यांनी केली.
(हेही वाचा : MSEB : गोरेगाव मुलुंड रस्ता प्रकल्पाचा मार्ग भांडुपमध्ये ‘एमएसईबी’मुळे अडला)
त्यांच्या या महान योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९६३ मध्ये डॉ. कुरियन यांना सामुदायिक नेतृत्वासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने डॉ. कुरियTATन यांना १९६५ मध्ये पद्मश्री, १९६६ मध्ये पद्मभूषण आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. तसेच त्यांना १९८६ मध्ये कृषीरत्न पुरस्कार, १९८९ मध्ये जागतिक अन्न पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
हेही पहा –