केंद्र सरकारच्या (Center Government) वतीने, राज्यांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत अन्नधान्य घेणे सुरू ठेवण्यास सांगितले आहे, कारण ही योजना आता केंद्राने पुढील पाच वर्षांसाठी वाढवली आहे. यापूर्वी ही योजना ३१ डिसेंबरला संपत होती. पुढील आदेशापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत अन्नधान्य वितरण सुरू ठेवण्याचा संदेश अन्न मंत्रालयाकडून FCI ला देण्यात आला आहे.
5 वर्षांची योजना वाढवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने छत्तीसगडमधील निवडणूक रॅलीत डिसेंबर 2023 मध्ये संपणारी मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली. सरकारने (Center Government) एफसीआयला पाठवलेली माहिती ही योजना पाच वर्षांसाठी वाढवण्याचे एक पाऊल मानले जात आहे.
(हेही वाचा Chine : चीनमध्ये पसरतोय भयंकर आजार; लहान बालके मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) व्यतिरिक्त, सरकार मोफत रेशनच्या वितरणावर अतिरिक्त 15,000 कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता आहे. AFSA अंतर्गत, सरकार आधीच अनुदानावर धान्य पुरवते. अधिकृत अंदाजानुसार, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना नियोजित वेळेनुसार चालवण्यासाठी सुमारे 11 लाख कोटी रुपयांची आवश्यकता असेल.
FCI चा तांदूळ आणि गव्हाची किंमत 2023-24 या आर्थिक वर्षात 39.18 रुपये प्रति किलो आणि 27.03 रुपये प्रति किलो असण्याचा अंदाज आहे, जो आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 35.62 रुपये प्रति किलो आणि 27.03 रुपये प्रति किलो होता.
Join Our WhatsApp Community