केंद्र सरकारने काही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ जाहीर केली आहे. महागाई भत्त्यात ही वाढ १ जुलै २००३ पासून लागू होईल. या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १५ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला असून, त्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. मात्र, त्याचा लाभ ५व्या आणि ६व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
(हेही वाचा : Uttarkashi Tunnel Accident : अमेरिकेतील तज्ज्ञांच्यामते कामगारांना बाहेर काढण्यास लागणारं आणखी वेळ)
अर्थ मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (DA) सहाव्या वेतन आयोग आणि पाचव्या वेतन आयोगांतर्गत वाढ करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन निवेदनात सार्वजनिक उपक्रम विभागातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ झाल्याचे म्हटले आहे. ईटीच्या अहवालानुसार, कार्यालयीन ज्ञापनात असे म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी) सहाव्या वेतन आयोगाची पूर्व-सुधारित वेतनश्रेणी किंवा ग्रेड वेतन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्याचा महागाई भत्ता २१२ टक्क्यांवरून २३० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. म्हणजे कर्मचा-यांचा महागाई भत्ता १८ टक्क्यांनी वाढवला आहे. ही वाढ १ जुलै २०२३ पासून लागू होणार आहे. १८ टक्के डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात ७ हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
Join Our WhatsApp Community