Russia Drone Attack: रशियाचा युक्रेनवर भीषण ड्रोन हल्ला, लष्करी अधिकाऱ्यांचा दावा

या हल्ल्यामुळे ७७ निवासी इमारती आणि १२० कार्यालयांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

170
Russia Drone Attack: रशियाचा युक्रेनवर भीषण ड्रोन हल्ला, लष्करी अधिकाऱ्यांचा दावा
Russia Drone Attack: रशियाचा युक्रेनवर भीषण ड्रोन हल्ला, लष्करी अधिकाऱ्यांचा दावा

रशियाने युक्रेनवर २०२२ मध्ये (Russia Drone Attack) आक्रमण केल्यानंतर आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक ‘ड्रोन’ हल्ला शनिवारी युक्रेनची राजधानी कीव्हवर केला, असा दावा युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. स्थानिक वेळेनुसार हा हल्ला पहाटे ४च्या सुमारास सुरू झाला. तो ६ तासांपेक्षा जास्त काळ चालला.

युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेश्चुक यांनी त्यांच्या ‘टेलिग्राम’वर नमूद केले आहे की, रशियाच्या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने कीव्हला लक्ष्य केले गेले. या हल्ल्याबाबत युक्रेनच्या सशस्त्र दलांनी सांगितले की, रशियाने सुमारे ७५ इराणनिर्मित ‘शाहेद ड्रोन’सह युक्रेनवर हल्ला केला. त्यापैकी ७१ ड्रोन पाडण्यात यश मिळाले आहे. कीव्ह शहर प्रशासनाचे प्रमुख सेर्ही पोप्को यांनी सांगितले की, कीव्हवर ड्रोनद्वारे करण्यात आलेला हा सर्वात प्राणघातक हवाई हल्ला होता. या हल्ल्यामुळे ७७ निवासी इमारती आणि १२० कार्यालयांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

(हेही वाचा – Jayant Gadit : गुजराती साहित्य क्षेत्रात मोठे योगदान – कादंबरीकार जयंत गडित)

हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी प्रयत्न
शहरात काही तास सुरू असलेल्या या ड्रोन हल्ल्यात किमान ५ नागरिक जखमी झाले असून अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. जखमींमध्ये एका ११ वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी ‘टेलिग्राम’वर नमूद केले की, आमच्या सैनिकांनी बहुतेक ड्रोन पाडले. आम्ही आमचे हवाई संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी आणि ड्रोन पाडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत, अशी माहिती कीव्हचे महापौर क्लिश्चको यांनी दिली आहे.

होलोडोमोर मेमोरियल डेच्या दिवशीच हल्ला
‘होलोडोमोर मेमोरियल डे’च्या दिवशीच सकाळी हा हल्ला करण्यात आला. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात चौथ्या शनिवारी हा स्मृतिदिन पाळला जातो. १९३२ ते १९३३ या काळात तत्कालीन सोव्हिएत संघातील युक्रेनमधील मानवनिर्मित भीषण दुष्काळ टंचाईमुळे लाखो युक्रेनियन लोकांचे बळी गेले होते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.