Indigo Airlines: कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा होणार बंद; ‘इंडिगो’ची माहिती

नव्या सेवेनुसार कोल्हापूरहून तिरुपतीला जाणारे विमान दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण करेल.

231
Indigo Airlines: कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा होणार बंद; 'इंडिगो'ची माहिती
Indigo Airlines: कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा होणार बंद; 'इंडिगो'ची माहिती

विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सकडून (Indigo Airlines) सध्या नियमित सुरू असलेली कोल्हापूर-तिरुपती या थेट विमानसेवा (Kolhapur-Tirupati Airline) १५ डिसेंबरपासून बंद होणार आहे. त्यानंतर ही सेवा व्हाया हैदराबाद अशी होणार असल्याने प्रवाशांना पूर्वीपेक्षा ३ तास ५ मिनिटे जादा वेळ तसेच सव्वा दोन हजारांहून अधिक तिकीट दराचा फटका बसणार आहे, अशी माहिती इंडिगो कंपनीने संकेतस्थळावरून दिली आहे.

भाविकांचा सुखकर प्रवास, वेळची बचत व्हावी या हेतूने कोल्हापूर-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. बारा मे २०१९ रोजी इंडिगो कंपनीने ही सेवा सुरू केली. सुरुवातीपासून या सेवेला चांगला प्रतिसाद लाभला. कोरोनाच्या काळातही सेवा राहिली. त्यानंतर एक मे २०२१ पासून पुन्हा या सेवेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही सेवा अखंडित सुरू होती. त्याला प्रतिसादही चांगला होता, करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि तिरुपती दर्शनासाठी कोल्हापूर-तिरुपती ही थेट विमानसेवा असल्याने मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र, ती बंद होत असल्याने आता भाविक प्रवाशांना कोल्हापूरहून थेट तिरुपतीला जाता येणार नाही. नव्या सेवेनुसार तिरुपतीला जायचे असेल तर व्हाया हैदराबाद जावे लागणार आहे.

(हेही वाचा – Mumbai News : मराठी पाट्या लावा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, मनसेचा खळखट्याक चा इशारा)

नव्या सेवेची माहिती…
नव्या सेवेनुसार कोल्हापूरहून तिरुपतीला जाणारे विमान दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण करेल. त्यानंतर ते हैदराबादला जाईल. तेथून सायंकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी ते तिरुपतीला पोहचणार आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाची कोल्हापूर विमानतळ प्रशासनाला कोणत्याही प्रकारे माहिती दिली नसून आम्ही कंपनीला थेट सेवेबाबतचे पत्र पाठविणार असल्याचे विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.