भारतीय जनता पक्षाचे सुपर वॉरियर्स म्हणजे, जिल्ह्यातील प्रमुख योद्धे आहेत. आगामी काळात तुमच्यातील कोणीतरी सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार झालेले मला पाहावयाचे आहे. मुळातच, आपले काम पक्षासाठी नसून देशासाठी आहे. सुपर वॉरिअर्सने दिवसातील तीन तास पक्षाला दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पक्षाचे ३४० हून अधिक खासदार निवडून येतील, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी येथे केला.
स्वामी नारायण मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या मालेगाव बाह्य-मध्य व बागलाण विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधी व सुपर वॉरियर्सची संवाद सभा शनिवारी (२५ नोव्हेंबर ) झाली. यावेळी बावनकुळे बोलत होते.
(हेही वाचा : Moon Dust: ‘या’ चिमूटभर धुळीची किंमत माहीत आहे का? वाचा सविस्तर…)
पक्षाचे महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉ. सुभाष भामरे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, डॉ. प्रतापराव दिघावकर, धनराज विसपुते, डॉ. विलास बच्छाव, दादा जाधव, दीपक पवार, नितीन पोफळे, संजय भामरे, नितीन सोनवणे, एकलाख नागा, देवा पाटील, गजेंद्र देवरे, कमलेश निकम आदी उपस्थित होते.
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री (Devendra Fadnvis)
बावनकुळे म्हणाले, की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४५ हून अधिक जागांवर पक्षाला विजय मिळेल. नरेंद्र मोदी (Narendra Modi) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. राज्यात महायुतीची सत्ता येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community