आयुर्वेदात तुळशीचे महत्त्व पुरातन काळापासून सांगण्यात आले आहे. धार्मिक कार्याप्रमाणेच तुळशीचा वापर आरोग्यासाठी लाभदायक आहे. तुळशीमध्ये जीवनसत्त्व क, झिंक जास्त प्रमाणात असते त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अनेक औषधी गुणधर्मही तुळशीच्या पानांमध्ये आहेत. तुळशीचे रोपटे (Tulsi Shakti) ज्या जागेत लावले असेल, त्या परिसरातील हवा शुद्ध राहण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचा औषध म्हणून वापर केला जातो. या औषधी वनस्पतीमध्ये असलेल्या अनेक औषधी गुणधर्मांमुळे ‘इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन्स’ या संस्थेतर्फे ‘तुलसी शक्ती’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
कुटुंबातील प्रत्येक सदस्य निरोगी राहावा, हे या उपक्रमाचे ध्येय आहे. कोरोनासारखी महामारी, प्रदूषण आणि व्हायरल इन्फेक्शनअंतर्गत होणारे आजार (लाईफस्टाईल डिसिज) होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज तुळशीची ४-५ पाने पाण्यात घालून हे पाणी प्यायल्यास अनेक फायदे होऊ शकतात. ‘तुलसी शक्ती’ या उपक्रमांतर्गत ही माहिती अनेक लोकांना दिली जाते. याकरिता सोसायटी, इमारतींमध्ये तुळशीच्या रोपांची लागवड करणे, तुळशीची रोपे वाटणे, पाण्यात तुळशीची पाने घालून पाणी पिण्याचे फायदे लोकांना सांगणे…असे उपक्रम राबवण्यात येतात.
तुळशीचे पाणी कसे तयार कराल?
एका पातेल्यात किंवा पाण्याच्या बाटलीत तुळशीची पाने स्वच्छ धुवून ठेवा. आवडीनुसार, तुळशीची पाने असलेले पाणी उकळवा. कोमट किंवा थंड झाल्यानंतर हे पाणी पिऊ शकता.
तुळशीची पाने घातलेले पाणी पिण्याचे फायदे…
– रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
– तुळशीत अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे अनेक आजारांपोसून संरक्षण मिळते.
-सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
– मधुमेहावरही नियंत्रण राहते.
– तुळशीच्या पानांमध्ये अँण्टी बॅक्टेरियल, अँण्टी व्हायरल आणि अँण्टी-इफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
– संसर्गजन्य आजार सर्दी, ताप, खोकला लवकर बरे व्हायला मदत होते.
– कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते.
– ताणतणावावर मात करण्यासाठी तुळस गुणकारी आहे.
– डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
– त्वचा आणि केसांसाठी तुळस उत्तम आहे.
– वजनवाढीवर नियंत्रण मिळवायचे असल्यास तुळशीचे पाणी प्यायल्यास फायदा होऊ शकतो.
-पचनक्रिया सुधारण्यासाठी तुळशीचे पाणी प्यायल्यास फायदा होतो.
– दातांचे आरोग्य सुधारते.
– शरीरातील विषारी घटक तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
अधिक माहितीकरिता –
‘इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन्स’ या संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या तुलसी शक्ती या उपक्रमात सहभागी होण्याकरिता www.tulsishakti.com या संकेतस्थळाला भेट द्या.
उपक्रमाबाबत प्रतिक्रिया…
‘इंडिया पॉझिटिव्ह सिटिझन्स’ संस्थेच्या संस्थापक सविता राव यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही ‘तुलसी शक्ती’ उपक्रमाबाबत लोकांमध्ये तुळशीचे पाणी पिणे आरोग्यसाठी किती आवश्यक आहे, याबाबत माहिती देतो, यामुळे अनेकांचे विविध प्रकारचे आजार दूर झाले आहेत. रक्तदाबावर नियंत्रण आले, दररोज घ्यावे लागणारे इन्सुलिन आता बंद झाले आहे, उत्साह वाढला, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या, असे त्या म्हणाल्या.
टिप – प्रकृतीप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.
हेही पहा –