Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे भुजबळांना प्रत्युत्तर; म्हणाले…

Maratha Reservation : 'वय झाल्यामुळे भुजबळ असे बोलतात, त्यांचे केस पांढरे होऊन उपयोग काय, जर दुसऱ्या समाजाबद्दल आकस असेल ?', तर असे म्हणत जरांगे पाटलांनी हिंगोलीतील भुजबळांच्या भाषणावर प्रत्युत्तर दिले.

146
Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे भुजबळांना प्रत्युत्तर; म्हणाले...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे भुजबळांना प्रत्युत्तर; म्हणाले...

‘भुजबळांना काहीच माहित नाही, मग कशाला केस पांढरे केलेत’, अशा शब्दांत प्रश्न मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. भुजबळांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर देखील जरांगे पाटलांनी उत्तर दिले. भुजबळांची (chhagan bhujbal) आंदोलने ही अशीच असतात वाटते. ते बीडमध्ये अश्रू पुसायला गेले मग अंतरवाली सराटीमध्ये का आले नाहीत ? भुजबळांचे केस पांढरे झाले आहेत; पण त्याचा काहीच उपयोग नाही, असे प्रतिप्रश्न मनोज जरांगे पाटील म्हणाले.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : कुणबी प्रमाणपत्रे देणे थांबवा; छगन भुजबळांची मागणी)

‘वय झाल्यामुळे भुजबळ असे बोलतात, त्यांचे केस पांढरे होऊन उपयोग काय, जर दुसऱ्या समाजाबद्दल आकस असेल ?’, तर असे म्हणत जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) हिंगोलीतील भुजबळांच्या भाषणावर प्रत्युत्तर दिले.

‘तुमच्या पांढऱ्या केसांचा आता काही उपयोग नाही’, असे म्हणत जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर प्रत्यारोप केले. सध्या राज्यात ओबीसी (OBC) विरुद्ध मराठा (Maratha) हा वाद चांगलाच पेटला आहे. तसेच भुजबळ आणि जरांगे पाटलांकडून एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर देखील टीका होत आहे.

(हेही वाचा – Myanmar Refugees : बंडखोरीनंतर म्यानमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; सैनिक पळून येतायेत भारताच्या आश्रयाला; काय आहे भारतासमोर आव्हान? )

नारायण कुचे यांचा पुळका का ?

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळांनी अन्य गोष्टीच्या पिपाण्या कशाला वाजवायच्या ? रावसाहेब दानवे, नारायण कुचे यांना विरोध होतो. रोहित पवार (Rohit Pawar), राजेश टोपे (Rajesh Tope) यांना प्रवेश का देतात ? रोहित पवारांची देखील जाग्यावर यात्रा अडवली. नारायण कुचे तुमच्या जातीचे आहेत; म्हणून तुम्हाला पुळका आला आहे का ?

हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेतून (OBC reservation) छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर अनेक आरोप केले. यापूर्वी जरांगे यांनी उडवलेल्या ‘म्हातारा’ या खिल्लीचाही भुजबळ यांनी समाचार घेतला. ‘मला म्हातारा म्हणतोय, पण डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी आंदोलनं केलीत’, असे भुजबळ यांनी म्हटले होते.

(हेही वाचा – PM – Mann Ki Baat : हा दिवस विसरू शकत नाही; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी केले २६/११ च्या हुतात्म्यांचे स्मरण)

त्या सभेला दंगल सभा नाव द्या

हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेचे (OBC Elgar Sabha) आयोजन करण्यात आले होते. या सभेला अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेला दंगल सभा असं नाव द्यायला हवे, असे म्हणत जरांगे पाटलांनी ओबीसी सभेवर टीका केली.

मी ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार

माझे पाय तोडायला येत असतील, तर या मी वाट बघतोय. माझे पाय तोडायला तरी याल, मी माझ्या समाजासाठी काहीही करायला तयार आहे. पण मी ओबीसीतूनच मराठा आरक्षण (maratha reservation) घेणार, असे जरांगे पाटील या वेळी म्हणाले. (Manoj Jarange)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.