Mumbai Attack : २६/११ सारखे हल्ले होऊ न देण्याची जबाबदारी केवळ सुरक्षारक्षकांची नव्हे तर सामान्यजनांचीही – मंगलप्रभात लोढा 

108

मुंबईवर २६/११ चा जो हल्ला (Mumbai Attack)  झाला, ते ८० तासांचे युद्धच होते. पुन्हा अशी घटना होऊ न देण्याची जबाबदारी केवळ सैनिक आणि सुरक्षारक्षकांचीच नाही तर ती सर्वसामान्यांचीही आहे. आपल्या आजूबाजूला काय अघटित, अवैध घडत असेल तर ते सामान्य नागरिकांनी सजगतेने पाहायला पाहिजे, हा बोध आपण या कार्यक्रमातून घेऊ, असे प्रतिपादन मुंबईचे पालकमंत्री आणि कौशल्य, उद्योजगता, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

२६/११ च्या जिहादी अतिरेक्यांच्या मुंबईवरील भ्याड हल्ल्याचा  (Mumbai Attack) प्रतिकार करणाऱ्या काही साहसी वीरांचे अनुभव कथन व कौतुक आणि हल्ल्याच्या निषेधार्थ सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच आणि सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर, कॅप्टन विक्रमादित्य सिंग, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचचे कार्यवाह विनायक काळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. सुनील कापडे यांनी केले.

(हेही वाचा Mumbai Attack : भारताची सागरी सुरक्षा – पेला अर्ध्याहून अधिक भरलेला; पण अजूनही पुष्कळ काम बाकी)

भारतात आजही राष्ट्रभक्ती टिकून

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील  (Mumbai Attack) हौतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले, हे अभिनंदनास्पद आहे. कारण हीच तरुण शक्ती पुढे देश चालवणार आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले. आज इस्रायलमध्ये चौकाचौकांमध्ये कुणा नेत्याचे पुतळे किंवा नावे नाहीत, तर तिथे हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकाचा पुतळा उभारला जातो किंवा नाव दिले जाते. त्या चौकातून जाणारे देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यापासून सर्वसामान्य जनता त्यांना अभिवादन करत असते. आज पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्ये अस्थिरता आहे, भारतात मात्र तशी स्थिती नाही; कारण भारतात आजही राष्ट्रभक्ती टिकून आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.