राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडला. मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अवकाळी पाऊस पडला. पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मुंबई, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सोमवार, २७ नोव्हेंबरला मुंबईत ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शहापूरमध्ये अवकाळी पाऊस
मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं महत्त्वाचा इशारा जारी केलाय. येत्या 3 ते 4 दिवसात मुंबई, पालघरसह कोकणच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईतील अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात रिझझिम पाऊस पडत आहे. शहापूरमध्येही अवकाळी पाऊस पडला. राज्यभरात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
(हेही वाचा – Pune Accident : पुणे-नगर मार्गावर टँकर उलटला, वायुगळतीमुळे वाहतूक दोन तास बंद)
अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित
नागरिकांना हिवाळ्यात पावसाचा अनुभव मिळत आहे तसेच हवामानातील बदलांमुळे आजाराचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्यामुळे नागरिकांना हिवाळ्यात पावसाचा अनुभव मिळत आहे. हवामानातील बदलांमुळे आजारांचं प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी पावसामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वातावरणात दव निर्माण झाल्यामुळे अनेकांना घशाचा त्रास सुरू झाला.
हेही पाहा –