अँडर्स सेल्सियस (Anders Celsius) यांचा जन्म स्वीडनमधील उप्साला येथे २७ नोव्हेंबर १७०१ रोजी झाला. त्यांचे वडील निल्स सेल्सियस हे खगोलशास्त्राचे प्राध्यापक होते, ओलोफ सेल्सियस हे त्यांचे काका होते आणि ते वनस्पतिशास्त्रज्ञ होते. मॅग्नस सेल्सिअस हे त्यांचे आजोबा होते आणि ते गणितज्ञ होते. इतका समृद्ध कौटुंबिक वारसा त्यांना लाभला होता.
अर्थात अँडर्स सेल्सियस यांनी विज्ञानात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ते लहानपणापासूनच प्रतिभावान गणितज्ञ होते. अँडर्स सेल्सियस (Anders Celsius) यांनी उप्साला विद्यापीठात शिक्षण घेतले. या विद्यापीठात त्यांचे वडील शिकवायचे, तसेच १७३० मध्ये ते तेथे खगोलशास्त्राचे प्राध्यापक झाले. प्रख्यात स्वीडिश कवी आणि अभिनेता जोहान सेल्सियस हे त्यांचे मामा होते.
(हेही वााचा-China Pneumonia: ‘चिनी न्यूमोनिया’मुळे मोदी सरकारकडून राज्यांना सूचना, जागतिक आरोग्य संघटनेने दिली ‘ही’ माहिती)
सेल्सियस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक खगोलीय निरीक्षणे केली, ज्यात ग्रहण आणि विविध खगोलीय बाबींचा समावेश आहे. सेल्सियस यांनी त्यांची फोटोमेट्रिक मापन प्रणाली तयार केली. या प्रणालीचा वापर करून, त्यांनी ३०० तार्यांचे परिमाण सूचीबद्ध केले. सेल्सियस यांना उत्तरेकडील प्रकाशादरम्यान पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांचे विश्लेषण करणारा आणि ताऱ्यांचे तेज मोजणारा पहिला खगोलशास्त्रज्ञ मानले जाते.
१७२५ मध्ये ते उप्साला येथील रॉयल सोसायटी ऑफ सायन्सेसचे सचिव झाले. त्यांनी १७३९ मध्ये स्टॉकहोममध्ये रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसच्या स्थापनेला पाठिंबा दिला. या अकादमीच्या पहिल्या बैठकीत ते सदस्य म्हणून निवडले गेले.
१७४२ मध्ये त्यांनी उप्साला येथील रॉयल सोसायटी ऑफ सायन्सेस या सर्वात जुन्या स्वीडिश वैज्ञानिक सोसायटीला सेल्सियस टेंपरेचर स्केल प्रस्तावित केले. विज्ञान जगतात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आज या महान वैज्ञानिकाची जयंती आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community