मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडला. पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अशातच आज म्हणजेच सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत (Unseasonal Rain) ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे या पावसामुळे मुंबईतील हवा सुधारली आहे.
(हेही वाचा – Sharad Pawar यांची पुन्हा पावसात सभा; राजकीय वर्तुळात चर्चा)
गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता आता सुधरताना दिसत आहे. मुंबईतील अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मुंबईकरांची तारांबळ उडाली असली, तरी हवेची गुणवत्ता (Mumbai Air Pollution) सुधारण्यास मात्र मदत झाली आहे.
मुंबईची हवा सुधारली
दिवाळीपूर्वी मेट्रो आणि इतर बांधकाम आणि त्यानंतर दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा घसरला होता. पण, आता अवकाळी पावसानंतर (Unseasonal Rain) मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा होताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI 100 च्या खाली आहे. बीकेसीचा AQI 103 वर आहे. आज देखील मुंबई मुंबईत अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. त्यामुळे, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार आहे.
(हेही वाचा – Unseasonal Rain: राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला)
मुंबईतील हवेची गुणवत्ता
संपूर्ण मुंबई – 60 AQI
कुलाबा – 76
भांडुप – 37
मालाड – 35
माझगाव – 47
वरळी – 33
बोरिवली – 65
बीकेसी – 103
चेंबूर – 89
अंधेरी – 67
नवी मुंबई – 53
(हेही वाचा – Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट; कांदा, द्राक्ष पिकांचे नुकसान)
हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?
शून्य ते 50 एक्यूआय – उत्तम
50 ते 100 एक्यूआय – समाधानकारक
101 ते 200 एक्यूआय – मध्यम
201 ते 300 एक्यूआय – खराब
301 ते 400 एक्यूआय – अतिशय खराब
401 ते 500 एक्यूआय – गंभीर
हेही पहा –
Join Our WhatsApp Community