MNS: कुर्ल्यात अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक; फिनिक्स मॉलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

141
MNS: कुर्ल्यात अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक; फिनिक्स मॉलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
MNS: कुर्ल्यात अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक; फिनिक्स मॉलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

कुर्ल्यात अमराठी पाट्यांविरोधात मनसे (MNS) आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या भागामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुर्ल्यातील फिनीक्स मार्केटसिटी मॉलमध्ये मनसेने आंदोलन सुरू केलं आहे. या मॉलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

मॉलवरील अमराठी पाट्याविरोधात मनसे आक्रमक झाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुर्लाच्या फिनिक्स मार्केट सिटी मॉल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत सांगून २ महिने होऊन गेले तरीही फिनिक्स मॉलकडून मराठी पाट्या लावण्याबाबत गांभीर्य घेतले जात नाही.

(हेही वाचा – Anders Celsius : स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ अँडर्स सेल्सियस)

मनसे स्टाईलने भूमिका घेणार…

फिनिक्स मार्केट मॉल सिटीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहोत. आज आम्ही त्यांच्यावर मनसे स्टाईलने भूमिका घेतली जाणार आहे. जोपर्यंत मराठी पाट्या लावल्या जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही कोणालाही मॉलमध्ये येऊ देणार नाही. पोलीस पोलिसांचं काम करतील. आम्ही आमचं काम करू, अशी माहिती मनसेचे कुर्ला येथील कार्यकर्ते नरेंद्र भानुशाली यांनी दिली आहे.

आदेशाची अंमलबजावणी करावी…

मॉलकडून कुठलही स्पष्टिकरण दिलं जाणार नाही, असं सांगितलं जातंय. मॉलची संपूर्ण सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मॉल प्रशासनाशी समाजमाध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यातील दुकानांवर आणि आस्थापनांवर मराठी भाषेत फलत असावेत असा नियम असतानाही या नियमाला हरताळ फासला जात आहे. या प्रकरणात मनसेने आंदोलनाचा इशारा दिलेली डेडलाईन संपत आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापनावरील नामफलक हे मराठीत लावण्याचे आदेश पारित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे म्हटल्याचे बॅनर मनसेने मुंबईत लावले आहेत. अजूनही महाराष्ट्रात काही ठिकाणी दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचे मनसेने निदर्शनास आणून खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.