UBT : मराठी पाट्यांसाठी आता उबाठा गट ही आक्रमक

ज्यांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या त्यांचे अभिनंदन केले आणि ज्यांनी अजूनही पाट्या लावल्या नाहीत त्यांना येत्या दोन दिवसांत मराठी भाषेत पाट्या करा अन्यथा या पाट्या आमच्या स्टाईलने काढून टाकू त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील असा इशारा त्यांनी दिला

150
UBT : मराठी पाट्यांसाठी आता उबाठा गट ही आक्रमक
UBT : मराठी पाट्यांसाठी आता उबाठा गट ही आक्रमक

राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत सपंली असल्याने मनसेने रविवार पासूनच आंदोलनाला सुरवात केली आहे. दोन महिन्याची मुदत संपूनही अनेक दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत. यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेत काही ठिकाणी पाट्या फोडल्या. आता यात उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गटानेही उडी घेत मस्ती असलेल्या दुकानदारांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा आमदार अजय चौधरी यांनी दिला आहे. (UBT)

शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याच्या विधानसभेत एकमताने मराठी पाट्यांबाबत कायदा मंजूर केला. या कायद्याविरोधात व्यापारी हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले परंतु तिथे त्यांना फटकारले. त्यानंतर आता हा कायदा असल्याने दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या कराव्यात यासाठी मतदारसंघात फिरून आढावा घेतला. ज्यांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या त्यांचे अभिनंदन केले आणि ज्यांनी अजूनही पाट्या लावल्या नाहीत त्यांना येत्या दोन दिवसांत मराठी भाषेत पाट्या करा अन्यथा या पाट्या आमच्या स्टाईलने काढून टाकू त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील असा इशारा त्यांनी दिला. (UBT)

(हेही वाचा :MNS: कुर्ल्यात अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक; फिनिक्स मॉलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात)

New Project 2023 11 27T144202.656

सुप्रीम कोर्टाने दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठीदोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत २५ नोव्हेंबरला संपली. त्यानंतर महापालिकेने दुकानदारांना नोटीस पाठवून २८ नोव्हेंबरपासून मराठी पाटी नसेल तर कारवाई करू असा इशारा दिला आहे. तत्पूर्वी मनसेने अनेक ठिकाणी मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन दिले. काही ठिकाणी पाट्याही तोडण्यात आल्या. आता शिवसेना ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठी पाट्यांसाठी मुंबईत पुन्हा आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही पहा  –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.