आज भारत जसा आण्विक शस्त्रास्त्राने सज्ज आहे, तसाच शेजारील शत्रू राष्ट्र पाकिस्तानही (Pakistan) आण्विक शक्तीने सज्ज आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा या दोन्ही देशांमधील संबंध ताणले जातात, तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरून यात हस्तक्षेप केला जातो. मात्र या आण्विक शक्तीबाबत पाकिस्तान (Pakistan) किती बेजबाबदार आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरण सीएनएन या वृत्त वाहिनीवरील चर्चासत्रातून दिसून आले. ज्यामध्ये पाकिस्तानच्या संरक्षण तज्ज्ञाने अक्षरशः अकलेचे तारे तोडले, त्याच्या बेजबाबदार वक्तव्यावरून पाकिस्तानचा त्यांच्याकडील असलेला आण्विक शस्त्रात्रांचा साठा संपूर्ण हिंदू (Hindu) धर्म संपुष्टात आणण्यासाठी वापरण्याचा मनसुबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हटले आहे संरक्षण तज्ज्ञाने?
आम्ही आण्विक युद्ध करायला तयार होऊ, मग भले आम्ही त्यात संपून जाऊ; पण आमच्याबरोबर आम्ही हिंदुस्थानालाही संपवू, पण यामुळे सगळा हिंदू (Hindu) धर्म संपून जाईल. कारण जगात हिंदूंचा फक्त हिंदुस्थान हा एकमेव देश आहे, मुसलमानांचे (Muslim) पाकिस्तानसह ५७ राष्ट्रे आहेत. त्यामुळे आण्विक युद्धात हिंदू धर्म संपून जाईल; पण मुस्लिम (Muslim) धर्म हा ५६ राष्ट्रांमध्ये शाबूत राहील, असे वक्तव्य या संरक्षण तज्ज्ञाने केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
भारतातील मुसलमान अल्पवयीन मुलांचे झाले ब्रेनवॉश
उत्तर प्रदेशातील काही अल्पवयीन मुसलमान मुलांच्या मुलाखती एका वृत्तवाहिनीने घेतल्या, त्याचा व्हिडीओही सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामध्ये हे अल्पवयीन मुसलमान (Muslim) मुले म्हणतात, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री कोण आहेत, देशाचे गृहमंत्री कोण आहेत हे आम्हाला माहित नाही, आम्हाला या फालतू गोष्टींमध्ये पडायचे नाही. आम्ही फक्त इस्लाम जाणतो. आम्ही कलाम साहेब यांना ओळखत नाही कुराणला ओळखतो. कुराणमध्ये खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्ही जे विचार करता ते तुम्हाला जन्नतमध्ये मिळते. जन्नत या जगापेक्षा चांगले आहे. तिकडे परिश्ते आहेत. त्यांनी पाण्यामध्ये थुंकले तरी पाणी गोड बनते, शुद्ध होते. आम्ही हे सगळे कुराणमध्ये वाचले आहे. हे सगळ्या मुलांना शिकवले जाते, सगळ्या मुसलमान मुलांना हे माहित आहे. या सगळ्या गोष्टीची माहिती असायला हव्यात. ज्याला त्या माहित नाहीत तो मुसलमान (Muslim) नाही. इकडे दारू वगैरे हराम आहे पण जन्नतमध्ये सगळे हलाल आहे. तुम्ही तिकडे सगळे पिऊ शकता, असे ही अल्पवयीन मुसलमान मुले बोलताना या व्हिडिओत दिसत आहे.
(हेही वाचा 26/11 Do not forget Do not forgive कार्यक्रमातून वाहण्यात आली मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली)
Join Our WhatsApp Community