Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानाला भ्रष्टाचाराचा विळखा; अतिरिक्त कर्मचारी नियुक्ती; निविदेशिवाय खरेदी 

294

30 नोव्हेंबर 2023 पासून श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये (Shani Shingnapur) विश्वस्त मंडळाच्या परवानगीने चालू असलेला कोट्यवधीचा भ्रष्टाचार, अनधिकृत कामगार भरती, अनधिकृत बोगस विश्वस्त मंडळ बरखास्त करून आणि त्वरित प्रशासकाची नेमणूक करणे या आणि इतर मागण्यासाठी 30 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुवारपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याची माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालय अहमदनगर, पोलीस अधिक्षक अहमदनगर, जिल्हाधिकारी अहमदनगर, पोलीस निरीक्षक शिंगणापूर, पोलीस ठाणे व तहसीलदार नेवासा यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे, अशी माहिती शनीशिंगणापूरगावचे रहिवासी, तालुक्यातील नागरिक आणि शनी भक्तगण आणि सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे व अशोक टेमक  यांनी निवेदनाद्वारे आमरण उपोषणाची नोटीस दिली आहे.

शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) परिसरातील भाविक व येथील नागरिक यांनी यापूर्वी धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांच्याकडे वेळोवेळी देवस्थानच्या भ्रष्टाचाराबाबत व नवीन कर्मचारी भरतीबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही आजपर्यंत धर्मदाय आयुक्त यांनी कुठल्या प्रकारची दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने देवस्थानी कर्मचारी भरती केलेले मध्ये कुठल्याही प्रकारची पेपरला जाहिरात न देता कर्मचारी बोगस पद्धतीने भरती केली आहे? त्या कर्मचाऱ्यांना देवस्थानी आजपर्यंत कुठेही कामाची नेमणूक न करता फक्त घरी बसून पगार दिलेला आहे. त्या कर्मचाऱ्यांचा वापर तालुक्यातील राजकीय नेते आमदार त्यांच्या राजकारणासाठी त्याचा वापर करीत आहे.

तसेच त्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पद्धत, त्यांना कोणते काम केले, याचे दैनिक रजिस्टर ठेवलेले नाही. याबाबत चौकशी करण्याची मागणी करूनही मागणीप्रमाणे आजपर्यंत कुठली कारवाई केलेली नाही. त्यामुळे देशात प्रसिद्ध असलेले शनी शिंगणापूर देवस्थानची प्रतिमा खराब होत असल्याने देवावर असलेला विश्वास कमी होत आहे, तरी देवस्थानकडे असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पद्धत लागू करावी, ती देवस्थानच्या CCTV कॅमेऱ्याखाली हजेरी पद्धत लागू करावी, त्या कर्मचाऱ्याला दैनिक कोणते काम सोपवले आहे, याची कार्यालयीन प्रमुखाने दैनिक कामाचे रजिस्टर ठेवावे. तसेच तालुक्यातून इतर ठिकाणातून देवस्थानकडे आज रोजी किती कर्मचारी आहे व त्यांची नेमणूक कधी झाली व त्यांना शासन कामगार वेतन या नियमाप्रमाणे वेतन देत असल्याबाबतचे सर्व कर्मचाऱ्यांच्या नावासह भरती दिनांक, नेमणुकीसह दर्शनी भागात बोर्ड लावावे त्यामुळे गावातील ग्रामस्थांना व परिसरातील लोकांना देवस्थानकडे असलेल्याला कर्मचारीबाबत माहिती राहील.

(हेही वाचा Pakistan : अणुयुद्धात सगळा हिंदू धर्म संपेल, मुसलमान नाही; कारण जगभरात ५७ मुस्लिम राष्ट्रे; पाकच्या संरक्षण तज्ज्ञाने तोडले अकलेचे तारे )

‘या’ आहेत मागण्या 

  • देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करून ताबडतोब प्रशासक नेमणूक करण्यात यावी. शनी शिंगणापूर देवस्थान (Shani Shingnapur) येथे सुरू असलेला भ्रष्टाचार व भरमसाठ कामगार भरती यावर चौकशी समिती नेमणूक करावी व शासनाने विश्वस्त नेमणूक करावी तरच यावर आळा बसेल.
  • श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी.
  • सन 2018 मध्ये भाजप सरकारने श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केला आहे. परंतु आजपर्यंत वर नमूद अधिनियमाची अंमलबजावणी झालेली नाही. तरी श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती.
  • शंकरराव गडाख यांना चाहूल लागली आहे कि देवस्थानवर कारवाई होणार आहे, म्हणून त्यांनी आता जे १३२३ व आणखी साधारण नवीन ६०० असे एकूण १८०० पेक्षा जास्त मुले नवीन कामगार ज्यांना घरी बसून पगार चालू होता त्या पैकी ४५० कामगार हे ९-१-२०२३ रोजी कामावर बोलावले आहे व राहिलेले ८७३ देखील लवकरच कामावर बोलावणार आहेत.
  • मागील काही महिन्यामध्ये शनी शिंगणापूर देवस्थान (Shani Shingnapur) येथे दर्शन पावतीमध्ये साधारणपणे 2 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला, त्यामध्ये शनिशिंगणापूर चौथऱ्यावर जाण्यासाठी प्रत्येकी ५००/- रुपये पावती आहे. त्या पावत्या शनिशिंगणापूर देवस्थान यांच्या न देता खोट्या पावत्या छापून त्याची विक्री केली व शनिशिंगणापूर येथे देणगी घेण्यासाठी बारकोड लावला होता. बँक खाते तपशील शनिशिंगणापूर देवस्थानचा न देता, या लोकांनी स्वतः देवस्थानच्या नवे खाते उघडून त्यावर घेत होते.
  • तसेच आजपर्यंत कोट्यावधी रुपये देणगी ही शनैश्वर या नावाने खाजगी शिक्षण संस्था आहे, त्यावर घेतली जाते. आजपर्यंत शेकडो कोटी रुपये येथे भ्रष्टाचार झाला आहे.
  • शनिशिंगणापूर देवस्थान येथे बोगस कामगार भरती केली आहे, त्यामध्ये 1323 व आणखी साधारण नवीन ६०० असे एकूण १८०० पेक्षा जास्त मुले कर्मचारी यांना कायम केले आहे, ही कामगार भरती शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट हे सरकार जमा करण्याचे आदेश झाल्याच्या नंतर ठराव घेऊन यांना कायम करण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात यापैकी एकही व्यक्ती शनिशिंगणापूर देवस्थान येथे कामाला येत नाही व त्यातील काही व्यक्ती हे मोठ-मोठ्या खाजगी कंपन्यांमध्ये आधीच परमनंट आहेत. तेथे ते रोज कामावर देखील आहे व त्यांचा पगार देखील चालू आहे तरीदेखील त्यांना शनिशिंगणापूर देवस्थान येथे परमनंट करून त्यांना देवस्थान सुद्धा पगार दिला जातो, शनिशिंगणापूर देवस्थान हे इतकं मोठं नाहीये की 1323 कर्मचारी काम करू शकतील, या 1323 व आणखी साधारण नवीन ६०० असे एकूण १८०० पेक्षा जास्त मुले कर्मचाऱ्यांपैकी कर्मचारी दर्शनाला सुद्धा शनिशिंगणापूरला येत नाही. तरीदेखील या कर्मचान्यांना नित्यनियमाने देवस्थानमधून पगार दिला जातो. तरी या कामगार भरतीची एक समिती नेमणूक करून त्याच्यामार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
  • देवस्थान येथे 24 तास लाईट असून देखील दर महिना 40 लाख रुपयाचे किंमतीचे डिझेल जनरेटर वापरासाठी विकत घेतले जाते.
  • देवस्थानमध्ये चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी 500/- रुपये प्रति व्यक्ती अशी पावती छापण्यात आलेली आहे व ती दिलेली आहे, तर ही पावती देवस्थानची न देता तेथील काही कर्मचारी हाताशी धरून यांनी खाजगी पावत्या छापून त्यामध्ये करोडो रुपये भ्रष्टाचार केलेला आहे.
  • शनी शिंगणापूर देवस्थान (Shani Shingnapur) सुशोभिकरणासाठी 20 कोटी रुपये किंमतीचे निवेदन काढण्यात आले होते व व पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 50.12 कोटी रुपये खर्च झालेले आहे तरीदेखील मंदिराचे काम फक्त 50 ते 60 टक्के पूर्ण झाले आहे.
  • शनी शिंगणापूर देवस्थान यांनी 4,00,000 रुपये किंमतीची अॅम्बुलन्स वाहन विकत घेतले होते व ती अॅम्बुलन्स पुढच्या महिन्यामध्ये त्या गाडीचा लिलाव दाखवला जातो केला जातो व तेव्हा 90 हजार रुपये किमतीवर एका स्थानिक पुढाऱ्यांच्या मेडिकल कॉलेजकडून विकत घेतली गेली.

(हेही वाचा 26/11 Do not forget Do not forgive कार्यक्रमातून वाहण्यात आली मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.