BJP : लोकसभा निवडणुकीआधी भाजपात बंडखोरांची होणार घरवापसी; काय असणार प्लॅन?

112
Lok Sabha Election 2024 : भाजपचा बॉलिवूड-क्रीडा क्षेत्रातील चेहऱ्यांवर डोळा
Lok Sabha Election 2024 : भाजपचा बॉलिवूड-क्रीडा क्षेत्रातील चेहऱ्यांवर डोळा

मागील काही दिवसांमध्ये भाजपने पक्षशिस्त मोडली म्हणून किंवा निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली, त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले, परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी तब्बल 5 हजार नेते आणि कार्यकर्ते यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्यात येणार आहे. तसा प्लॅन करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात लखनऊच्या अवध भागातील बंडखोरांची घरवापसी  

भारतीय जनता पक्ष (BJP) लोकसभा निवडणुकीच्या काळात कसल्याही प्रकारची चूक होऊ देऊ इच्छित नाही. यामुळेच पक्षाने आपल्या जुन्या बंडखोर आणि नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पक्षात घेण्याच्या विचार केला आहे. महापालिका निवडणूक काळात ज्या उमेदवारांना तिकीट मिळाले नाही, त्या उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांची संख्या जवळपास 5 हजार एवढी आहे. भाजपने त्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र आता या सर्वांची घरवापसी करण्यासंदर्भात राज्य संघटनेने निर्णय घेतला आहे. यानुसार, पहिल्या टप्प्यात लखनऊच्या अवध भागातील बंडखोरांना पुन्हा एकदा पक्षात घेतले जाणार आहे.

(हेही वाचा Pakistan : अणुयुद्धात सगळा हिंदू धर्म संपेल, मुसलमान नाही; कारण जगभरात ५७ मुस्लिम राष्ट्रे; पाकच्या संरक्षण तज्ज्ञाने तोडले अकलेचे तारे )

पहिल्या टप्प्यात 250 बंडखोर भारतीय जनता पक्षात परतणार

भारतीय जनता पक्ष (BJP) सोमवारपासून बंडखोरांच्या घरवापसीला सुरुवात करेल. पहिल्या टप्प्यात अवध भागातील बंडखोरांना परत घेतले जाणार आहे. सुमारे 30 ते 35 बंडखोरांना लखनऊ येथील मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि अवध प्रदेशाध्यक्ष कमलेश मिश्रा यांच्या उपस्थितीत या लोकांची घरवापसी होईल. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात सुमारे 250 बंडखोर भारतीय जनता पक्षात परतणार आहेत. यात 14 माजी नगरसेवक, तीन माजी नगराध्यक्ष आणि काही प्रभाग अध्यक्षांचाही समावेश असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.