गझवा-ए-हिंद प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) रविवारी (२६ नोव्हेंबर) अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. या कारवाईदरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. एन. आय. ए. ने छापा टाकलेल्या संशयितांचे त्यांच्या पाकिस्तानी संचालकांशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, मॉड्यूलचे सदस्य भारतविरोधी विचारांचा प्रचार करण्यात गुंतले होते. (NIA Raid)
एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, मध्य प्रदेशातील देवास जिल्हा, गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्हा, उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्हा आणि केरळमधील कोझिकोड येथील संशयितांच्या घरांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. तसेच मोबाईल फोन आणि सिम कार्डांसह अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. (NIA Raid)
(हेही वाचा : Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानाला भ्रष्टाचाराचा विळखा; अतिरिक्त कर्मचारी नियुक्ती; निविदेशिवाय खरेदी )
या समाज माध्यमांवर पाकिस्तानचे नियंत्रण
- आरोपी मार्गूब अहमद याने भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश आणि येमेनसह इतर देशांतील अनेक लोकांना टेलिग्राम आणि बीआयपी मेसेंजरसारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या गटात समाविष्ट केले होते. हा गट पाकिस्तानातून कार्यरत होता.
- एन. आय. ए. च्या तपासात असे आढळून आले की मार्गूब अहमद भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी स्लीपर सेल तयार करण्याची तयारी करत होता. याशिवाय आरोपींनी बी. डी. गजवा ए हिंद बी. डी. या नावाने आणखी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता, ज्यामध्ये त्याने बांगलादेशी नागरिक जोडले होते.
- तपासानंतर एनआयएने ६ जानेवारी २०२३ रोजी आरोपी मार्गूब अहमदविरुद्ध आयपीसीच्या कलम १२१ ,१२१अ , १२२ सह अनेक कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community