बोरीवली पश्चिम येथील योगी नगर आणि एक्सर रोड जंक्शन, बोरीवली (प) येथील रिकाम्या तीन आणि दहिसर पश्चिम येथील शेफ हॉटेल समोरील मोकळ्या भूखंडाचा विकास करून त्या जागेचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. (Mumbai Open Space)
मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभागातील बोरीवली पश्चिम येथील योगी नगर आणि एक्सर रोड जंक्शन येथील न. भू. क्र. २१५१, २१५३अ (भाग) आणि २१५३बी येथील रिकाम्या जागेचा विकास करून त्याठिकाणी जॉगिंग ट्रॅकची निर्मिती, मैदानाची संरक्षण भिंतीची आवश्यक ठिकाणी डागडुजी, संरक्षण भिंतीवर नवीन ग्रील, मैदानाची संपूर्ण रंगरंगोटी करणे, हिरवळीची कामे, उद्यानातील शोभिवंत दिवे तसेच आसन व्यवस्था बसवण्याची कामे हाती घेण्यात येणार आहे. (Mumbai Open Space)
(हेही वाचा – China Masters Badminton : सात्त्विक, चिराग जोडीचा चायना मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभव)
तसेच दहिसर पश्चिम येथील न. भू. क्र. १०१/बी/१ येथील जागेचे सौदर्यीकरण करून विकास करण्यात येणार आहे. ज्यात संरक्षण भिंतीची आवश्यक ठिकाणी डागडुजीसह लाल माती पसरणे, मुख्य प्रवेश द्वार, संरक्षण चौकी, स्वच्छतागृह व भुमीगत पाण्याची टाकी यांची निर्मिती करण्यात येईल, तसेच गजेबो उभारणे, जॉगिंग ट्रॅक, संपूर्ण उद्यानास रंगरंगोटी करणे, पर्जन्य जल वाहीनीची कामे, तसेच विद्युतीकरणाची आणि बागायतीची कामे करण्यात येणार आहेत. (Mumbai Open Space)
या सर्व मोकळ्या भूखंडावर उद्यान व मनोरंजन मैदान विकसित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासर्व कामांसाठी एस बी एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (Mumbai Open Space)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community