Deepfake Video Issue : फेसबुक आणि यूट्यूब ला भारत सरकारने दिला इशारा

एआयच्या मदतीने खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्याची गरज आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, फेक न्यूज पसरवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर सरकार कठोर कारवाई करेल.

107
Deepfake Video Issue : फेसबुक आणि यूट्यूब ला भारत सरकारने दिला इशारा
Deepfake Video Issue : फेसबुक आणि यूट्यूब ला भारत सरकारने दिला इशारा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबला भारत सरकारने स्पष्ट शब्दात फटकारले आहे. डीपफेक आणि फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने या दोन्ही कंपन्यांना इशारा दिला आहे.केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया कंपन्यांना खोट्या बातम्या आणि डीपफेकसंदर्भात कडक इशारा दिला आहे.(Deepfake Video Issue)

न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने दिग्गज सोशल मीडिया कंपन्यांसोबत एक बैठक घेतली होती. यात सर्व सोशल मीडिया कंपन्यांना एका आठवड्याच्या आत कठोर पावले उचलण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, सोशल मीडिया नियम 2022 नुसार, सर्व सोशल मीडियांनी कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी धोकादायक असलेला कंटेन्ट आणि डीपफेक सारख्या प्रकरणांवर कठोर भूमिका घ्यायला हवी. (Deepfake Video Issue)

(हेही वाचा :China Masters Badminton : सात्त्विक, चिराग जोडीचा चायना मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभव)

सरकारची सक्ती -केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, सरकार डीपफेकच्या समस्येचा सामना करण्यासाठी काम करत आहे. एआयच्या मदतीने खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्याची गरज आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, फेक न्यूज पसरवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर सरकार कठोर कारवाई करेल. यासाठी सरकार सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.