Lalbaug Accident : मुंबईतील लालबाग पुलावर भीषण अपघात दोन ठार तीन गंभीर जखमी 

160
Lalbaug Accident : मुंबईतील लालबाग पुलावर भीषण अपघात दोन ठार तीन गंभीर जखमी 
Lalbaug Accident : मुंबईतील लालबाग पुलावर भीषण अपघात दोन ठार तीन गंभीर जखमी 
लालबाग पुलावर (Lalbaug Accident) सोमवारी पहाटे साडेपाच वाजता तीन वाहनांचा भीषण अपघात झाला .या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या काळाचौकी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेश जैस्वार आणि दुर्योधन गायकवाड असे अपघातात मृत्यु झालेल्या दोघांची नावे असून कोकीला वाघरी, जयराम यादव आणि लल्लूभाई साकेत असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास लालबाग पुलावर भायखळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन वाहतूक कोंडी झाल्याची माहिती काळाचौकी पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली.

(हेही वाचा-Mumbai Pune Expressway वरील पुलाचे गर्डर बसविण्यासाठी पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार)

भायखळा च्या दिशेने निघालेल्या सिमेंट मिक्सर ट्रकला पाठीमागून टॅक्सी धडकली होती, टॅक्सीला पाठीमागून आयसर कंपनीच्या टेम्पोने धडक दिली होती. टॅक्सीतील चालकासह एक महिला एक पुरुष गंभीरपणे जखमी होते तर आयसर टेम्पो मध्ये एक आणि मिक्सर चालक असे एकूण पाच जण गंभीरपणे जखमी झाले होते.पोलिसांनी अधिक मदत बोलावून पाचही जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी केईएम आणि जे.जे रुग्णालय येथे आणण्यात आले.
जेजे रुग्णालयात आणण्यात आलेले दुर्योधन आणि राजेश जैस्वार या दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान केईएम रुग्णालयात कोकीला वाघेला, जयराम यादव आणि लल्लुभाई साकेत या तिघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून टेम्पो चालक जयराम यादव आणि कोकीला वाघेला यांची प्रकृती चिंताजनक असून मिक्सर चालक साकेत हा किरकोळ जखमी झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भायखळाच्या दिशेने निघालेल्या टॅक्सीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयसर टेम्पोने धडक दिली असता टॅक्सी पुढे जाणाऱ्या सिमेंट मिक्सरला धडकली.

आयसर टेम्पो आणि मिक्सर मध्ये आल्याने टॅक्सीचा चेंदा मेंदा होऊन टॅक्सी चालक राजेश जैस्वार टेम्पोचा क्लिनर दुर्योधन गायकवाड यांचा मृत्यू झाला तर आयसर टेम्पो चालक जयराम यादव, मिक्सर चालक साकेत आणि टॅक्सीतून प्रवास करणारी महिला कोकीला वाघरी ही जखमी झाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसानी टेम्पो चालक यादव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=jGGdoQfVVa4&t=278s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.