मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडला. पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
काही शहरात या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आश्वासन दिले आहे.
(हेही वाचा – Lalbaug Accident : मुंबईतील लालबाग पुलावर भीषण अपघात दोन ठार तीन गंभीर जखमी )
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री ?
“गारपीट आणि अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झालेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे करावे, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत, हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर (Unseasonal Rain) सोडले जाणार नाही,” असे प्रतिपादन सोमवारी (२७ नोव्हेंबर) ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘धर्मवीर : २ मुक्काम पोष्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपटाचा मुहूर्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हे आश्वासन दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community