एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ (IND vs AUS 3rd T20) आता त्यांच्या पुढच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यामध्ये एकूण ५ टी – २० सामन्यांची मालिका सुरु असून पहिल्या दोन सामन्यांवर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे.
अशातच आज म्हणजेच मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 3rd T20) तिसरा टी २० सामना खेळणार आहे. गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.
पहिले दोन्ही सामने भारताने जिंकल्यामुळे आज ऑस्ट्रेलियाचा (IND vs AUS 3rd T20) संघ मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरले, तर भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील युवा टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
✈️ Next stop ➡️ Guwahati 👌👌#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DdwbksHZlj
— BCCI (@BCCI) November 27, 2023
बारसापारा क्रिकेट स्टेडियम
बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत फक्त तीन टी 20 सामने (IND vs AUS 3rd T20) झाले असून भारताला यामधील फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे, तर ऑस्ट्रेलियाचाही येथे फक्त एक सामना झाला असून त्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला.
तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा. (IND vs AUS 3rd T20)
Prasidh Krishna believes Suryakumar Yadav’s captaincy in the #INDvAUS T20I series has been just like his batting – impactful 🔥
More ➡️ https://t.co/BIUQmxoNcK pic.twitter.com/v5hccTxVaR
— ICC (@ICC) November 27, 2023
(हेही वाचा – Deepfake Video Issue : फेसबुक आणि यूट्यूब ला भारत सरकारने दिला इशारा)
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग 11
स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट/ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्कस स्टोयनिस, टिम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि विकेटकीपर), सीन एबॉट, नाथन एलिस, एडम जम्पा, तनवीर सांघा. (IND vs AUS 3rd T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community