ऋजुता लुकतुके
मधले दोन हंगाम गुजरात टायटन्स संघाकडून खेळल्यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आता पुन्हा एकदा त्याची जुनी फ्रँचाईजी मुंबई इंडियन्सकडे परतला आहे. मुंबई संघाने त्याला गुजरातकडून विकत घेतलं आहे. गुजरातकडून खेळताना हार्दिकने संघाच्या पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवून दिलं. तर गेल्यावर्षी ते उपविजेते ठरले होते. खुद्द हार्दिकने गुजरात टायटन्ससाठी ३१ सामन्यांत ८३१ धावा केल्या.
आता मुंबई संघात पुनरागमन केल्यानंतर हार्दिकने आपल्या जुन्या संघ सहकाऱ्यांसाठी एक खास संदेश आपल्या सोशल मीडिया खात्यावर लिहिला आहे.
‘गुजरात टायटन्स संघाचे व्यवस्थापक मंडळ, संघ सहकारी आणि चाहते यांच्या प्रती मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. संघाचा एक भाग असणं आणि नेतृत्व करणं हे माझ्यासाठी खूप मोलाचं होतं. आणि मी व माझे कुटुंबीय यांना सर्वांनी दिलेलं प्रेम आणि खेळाडू म्हणून आणि व्यक्ती म्हणून माझा झालेला सन्मान यासाठी मी सर्वांचा ऋणी राहीन,’ असं हार्दिकने ट्विटरवर भावना व्यक्त करताना म्हटलं आहे.
— hardik pandya (@hardikpandya7) November 27, 2023
गुजरात संघाबरोबरच्या आठवणी आणि अनुभव यांना माझ्या ह्रदयात खास स्थान असेल, असंही त्याने म्हटलं आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या कारकीर्दीत पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे. यातील चारवेळा मुंबई इंडियन्सकडून खेळताना आणि एकदा गुजरात टायटन्सकडून त्याला हा मान मिळाला. मुंबई इंडियन्ससाठी चार हंगामात १,४७६ धावा आणि ४२ बळी मिळवले आहेत. त्याचा स्ट्राईकरेट १५३ धावा इतका तगडा आहे.
Watch 𝐇𝐚𝐫𝐝𝐢𝐤 talk about his happy homecoming, teaming up with his 𝑜𝑙𝑑 𝑏𝑢𝑑𝑑𝑖𝑒𝑠 and resuming his journey with #MumbaiIndians 💙#OneFamily #MumbaiMeriJaan @hardikpandya7 pic.twitter.com/sm6dXGJYCI
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2023
गुजरात टायटन्स संघाचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी हार्दिक मुंबईकडे परत जात असल्याची बातमी रविवारी उशिरा फोडली होती. ‘गुजरात टायटन्स संघासाठी हार्दिकचं (Hardik Pandya) योगदान अमूल्य आहे. एक विजेतेपद आणि एक उपविजेतेपद त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पटकावलं. पण, अलीकडेच त्याने आपली जुनी फ्रँचाईजी मुंबई इंडियन्सकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचा मान आम्ही राखत आहोत,’ अशी प्रतिक्रिया सोलंकी यांनी दिली होती.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community