Rahul Gandhi यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार?

उत्तर प्रदेशातील कोर्टाने बजावले समन्स

122
Rahul Gandhi यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत ५ वर्षांपूर्वी अवमानजनक वक्तव्य केल्या प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोर्टाने हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सुलतानपूरच्या आमदार-खासदार कोर्टाने सोमवार २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत राहुल यांना आगामी १६ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

अमित शाह यांचा अपमान केल्या प्रकरणी भाजप नेते विजय मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवर राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) विरोधात ४ ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुलतानपूरचे न्याय दंडाधिकारी योगेश कुमार यादव यांच्या न्यायालयाने १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

(हेही वाचा – Unseasonal Rain : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’ – मुख्यमंत्री)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटक निवडणुकीदरम्यान ८ मे २०१८ रोजी बेंगळुरू येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ते म्हणाले होते, अमित शाह यांच्यावर हत्येचा आरोप आहे. याचा उल्लेख स्वतः सर्वोच्च न्यायालयाने लोया प्रकरणात केला होता. त्यामुळेच अमित शहा यांची विश्वासार्हता आहे, असे मला वाटत नाही. जो पक्ष प्रामाणिकपणा आणि शुद्धतेबद्दल बोलतो, त्या पक्षाच्या अध्यक्षावर खुनाचा आरोप आहे. न्यायमूर्ती बृजमोहन हरकिशन लोया यांचे डिसेंबर २०१४ मध्ये नागपुरात निधन झाले. त्यावेळी ते त्यांच्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. न्यायाधीश लोया गुजरातमधील प्रसिद्ध सोहराबुद्दीन शेख यांच्या हत्ये प्रकरणी सुनावणी करत होते. यामध्ये अमित शहांवर आरोप करण्यात आले होते. मात्र, न्यायमूर्ती लोया यांच्या मुलाने वडिलांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या एसआयटी तपासाशी संबंधित याचिकाही फेटाळून लावत, याला सामान्य मृत्यू म्हटले होते.

या प्रकरणी याचिकाकर्ते विजय मिश्रा म्हणाले की,

“राहुल (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. कारण ते स्वतः भाजपशी संबंधित आहेत. समाजात त्यांची बदनामीही झाली आहे. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला.यामध्ये विजय मिश्रा यांनी रामचंद्र आणि अनिल मिश्रा यांना साक्षीदार म्हणून हजर केले होते. विजय मिश्रा यांनी राहुल यांचे विधान पुरावे म्हणून सादर केले होते. जे यूट्यूब आणि इतर वेबसाइटवर प्रसिद्ध झाले होते. त्यांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयाला सांगितले होते की, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांवरून राहुल यांना आरोपी म्हणून बोलावण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.

(हेही वाचा – Lalit Patil Drug Case : पोलिसांकडून ‘त्या’ कर्मचाऱ्याला अटक)

या प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ४९९ नुसार खोट्या अफवा पसरवणे, टिप्पणी करणे किंवा एखाद्याची बदनामी करणे, कलम ५०० मध्ये मानहानीसाठी शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात २ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. (Rahul Gandhi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.