अर्थशास्त्राचे प्राध्यापक, वीर सावरकर अभ्यासक, भटकंती, त्यातील खाद्यानुभवावर बोलणारा आणि लिहिणारा, उत्तम व्याख्याता, लेखक असलेले अवलिया अनिल नेने (Professor Anil Nene) यांचे बँकॉक येथे वर्ल्ड हिंदू कॉन्फरन्सला गेले असताना निधन झाले.
सहज गप्पा मारताना समोरच्याला आपलंस करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती तसेच ‘सशस्त्र क्रांतीवीर’ हा विषय त्यांच्या आवडीचा होता. स्वित्झर्लंडच्या महाराष्ट्र मंडळात त्यांनी क्रांतिकारकांवर ऑनलाइन व्याख्याने दिली होती. या व्याख्यानांवर तयार झालेल्या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबरला पुण्यात होणार होते. क्रांतिकारकांसंदर्भातील अमूल्य माहिती देणाऱ्या त्यांच्या या पुस्तकाला डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची प्रस्तावना लाभली आहे.
(हेही वाचा –Lalit Patil Drug Case : पोलिसांकडून ‘त्या’ कर्मचाऱ्याला अटक )
प्राध्यापक अनिल नेने यांच्याविषयी आठवण सांगताना डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगतात, ‘लंडन वा पुण्यातून फोन करताना खास आवाजात, ‘नमस्कार शेवडेशास्त्री, काय म्हणताय?’ ही पृच्छा आता ऐकू येणार नाही. आम्हाला ‘शास्त्री’ हे संबोधन का वापरता?, असे विचारल्यावर, तुमचे वडील लंडनला आले होते तेव्हा त्यांना शास्त्री म्हणत होतो तेव्हा तुम्हालाही म्हणतो.’, हे त्यांचे उत्तर ठरलेले असे. त्यांच्याविषयीच्या अशा काही भावस्पर्शी आठवणींना उजाळा देत जड अंत:करणाने डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community