Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यातील काम अंतिम टप्प्यात, कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

बचाव पथकाकडून ४१ कामगारांच्या नातेवाईकांना कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहे.

143
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यातील काम अंतिम टप्प्यात, कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यातील काम अंतिम टप्प्यात, कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात (Uttarkashi Tunnel Rescue) अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच कामगारांना बोगद्याबाहेर काढले जाईल, अशी आशा आहे. रेस्क्यू टीम बोगद्याच्यावरून रॅट होल मायनिंग आणि बोगद्यावरून ड्रिलिंग सुरू आहे.

बचाव पथकाकडून ४१ कामगारांच्या नातेवाईकांना कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहे. कामगारांना बोगद्याच्या बाहेर काढल्यानंतर पहिल्यांदा त्यांना रुग्णालयात नेण्यात येईल, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

(हेही वाचा – Israel-Hamas conflict: इस्रायल-हमास युद्धबंदीचा कालावधी वाढला, ओलिसांच्या चौथ्या देवाणघेवाणीची तयारी)

रॅट-होल मायनिंग तंत्राचा वापर
या घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, ५२ मीटर पाइप टाकण्यात आले आहेत. ५७ मीटर अंतरापर्यंत पाइप टाकायचे आहेत. हा ढिगारा १० मीटरपर्यंत खणावा लागेल, असे त्यांनी सांगितले. ४-५ मीटर खोदकाम झाले आहे. तज्ज्ञ मजुरांची टीम रॅट-होल मायनिंग तंत्राचा वापर करून हाताने मलबा हटवत आहे. त्यानंतर त्यात ८०० मिमी व्यासाचे पाइप टाकण्यात येत आहेत. रॅट होल माइनर्सनी 4-5 मीटर खोदले आहे. आता केवळ 7-8 मीटर खोदकाम शिल्लक असल्याचे मानले जात आहे. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर त्यात 800 मिमी व्यासाचा पाइप टाकण्यात येणार आहे. यातूनच कामगार बाहेर पडतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.