Bihar School Holidays 2024 : बिहारमधील शाळांच्या हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द; ऊर्दू शाळांची साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी

Bihar School Holidays 2024 : नव्या नियोजनानुसार, 2024 मध्ये ईद आणि बकरी ईदला (bakrid) प्रत्येकी तीन दिवस सुट्टी असेल. याउलट २०२३ मध्ये ईद आणि बकरी ईदला दोन दिवसांची सुट्टी होती.

159
Bihar School Holidays 2024 : बिहारमधील शाळांच्या हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द; ऊर्दू शाळांची साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी
Bihar School Holidays 2024 : बिहारमधील शाळांच्या हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द; ऊर्दू शाळांची साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी

बिहारमधील शिक्षण विभागाने 2024 च्या सुट्टीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले आहे. (Bihar School Holidays 2024) बिहारमधील सरकारी शाळांमध्ये रक्षाबंधनाची सुट्टी (Raksha Bandhan Holiday) रद्द करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षण कार्यालयाने रक्षाबंधनासाठी 31 ऑगस्ट रोजी राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली होती; परंतु त्यात बदल करून ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

नव्या नियोजनानुसार, 2024 मध्ये ईद आणि बकरी ईदला (bakrid) प्रत्येकी तीन दिवस सुट्टी असेल. याउलट २०२३ मध्ये ईद आणि बकरी ईदला दोन दिवसांची सुट्टी होती. शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.के. पाठक यांच्या निर्देशानुसार प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांच्या सुट्टीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Uddhav Thackeray : ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची बातमी पुन्हा आली; पण दौरा होणार की नाही, माहिती नाही)

अनेक हिंदू सणांच्या दिवशी मुले जाणार शाळेत

के.के. पाठक यांच्या सूचनेनुसार सरकारी शाळांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी नसेल. तसेच, विश्वकर्मा पूजेसाठी सुट्टी नसेल. हरितालिका, जिवती, विश्वकर्मा पूजा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, भाऊबीज, गुरुनानक जयंती यासारख्या सणांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. बिहार शालेय शिक्षण विभागाने सप्टेंबर ते डिसेंबर या शाळांच्या सुट्टीसाठी नवीन नियाेजन जाहीर केले आहे.

(हेही वाचा – SC Panel On Manipur : मणिपूरमधील तणाव निवळण्यात कुणाचा अडथळा ? सर्वोच्च न्यायालाच्या समितीने सादर केला अहवाल)

दिवाळीची (Diwali) सुट्टी १ दिवस

बिहारमध्ये 29 ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत विविध सणांच्या दिवशी शाळांना 23 सुट्ट्या होत्या. ती कमी करून 11 दिवस करण्यात आली आहे. दुर्गापूजेच्या वेळी शाळांना सहा दिवसांची सुट्टी होती, जी आता तीन दिवस करण्यात आली आहे. यापूर्वी दिवाळीपासून छठ पूजेपर्यंत 13 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी होती. नवीन नियाेजनानुसार 12 नोव्हेंबरला चित्रगुप्त पूजा, 15 नोव्हेंबर आणि छठ पूजा 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशी सुट्टी असेल.

ऊर्दू शाळांची साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी

बिहार सरकारने आता ऊर्दू शाळांची (Urdu School) साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी जाहीर केली आहे. (School Holiday on Friday) बिहारमधील ज्या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या आहे, तेथे आता जुम्माच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी असेल. बिहार हे बहुधा देशातील पहिले राज्य असेल जिथे शुक्रवारी मुस्लिमांसाठी सरकारी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Vijay Hazare Trophy : नवख्या त्रिपुराचा गतविजेत्या सौराष्ट्रला दे धक्का)

उन्हाळ्याची सुट्टी शिक्षकांना नाही

उन्हाळ्याच्या सुट्ट्या 20 वरून 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. यावेळी विभागाने असेही ठरवले आहे की, उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी इतर दिवसांप्रमाणेच शाळेत येत राहतील. कॅलेंडरमध्ये असे म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या केवळ विद्यार्थ्यांसाठी असतात, शिक्षकांसाठी नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक-शिक्षक बैठका, विशेष वर्ग आणि परीक्षा घेण्यात येतील. (Bihar School Holidays 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.