मुंब्रा येथे एका भंगार दुकानात झालेला स्फोट हा नक्की कसला स्फोट होता याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणेने तेथील काही नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे (Forensic Department) पाठविण्यात आले आहे. फॉरेन्सिक अहवाला नंतरच हा स्फोट नक्की कसला होता हे समोर येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक तपासा वरून मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) राजूअली सलीमअली अहमद आणि त्याचे साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या स्फोटाचा तपास स्थानिक पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथकाकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. (Mumbra Blast)
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा चांद नगर मधील मुघल पार्क या इमारतीच्या तळ मजल्यावर असणाऱ्या एका भंगाराच्या दुकानात शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की इमारतीत असणाऱ्या घरांची तावदाने तुटून काचा सर्वत्र विखुरल्या गेल्या होत्या, तसेच इमारतीच्या भिंतींना तडे गेले, तसेच आजूबाजूच्या इमारतींमधील सात-आठ दुकाने, वाहने आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटाचा आवाज १ किमी पर्यंत ऐकू आल्यामुळे मुंब्रा शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. (Mumbra Blast)
स्फोटाची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, अग्निशमन दल, ठाणे महानगर पालिकेचे आपत्कालीन विभागाचे कर्मचारी तसेच ठाणे एटीएसचे पथक, बॉम्ब स्कॉड, श्वान पथके घटनास्थळी दाखल झाले होते. या स्फोटामुळे लागलेली आग अग्निशमन दलाकडून विझविण्यात आल्यानंतर तपास यंत्रणांनी घटनास्थळाची पाहणी केली.ज्या भगांर दुकानात स्फोट झाला ते दुकान राजुअली अहमद नावाच्या व्यक्तीला भाडे तत्त्वावर देण्यात आले होते, राजुअली त्या ठिकाणी भंगारचा त्याचसोबत चायनीज पदार्थ बनवून विक्रीचा धंदा करीत होता अशी माहिती समोर आली. (Mumbra Blast)
(हेही वाचा – Vijay Hazare Trophy : नवख्या त्रिपुराचा गतविजेत्या सौराष्ट्रला दे धक्का)
तपास यंत्रणेच्या आणि अग्निशमन दलाने केलेल्या प्राथमिक तपासात हा स्फोट सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झाला असल्याचे समोर आले असले तरी स्फोटाची तीव्रता लक्षात घेता हा स्फोट गॅससिलेंडरच्या स्फोटापेक्षा भयानक होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भंगार दुकानात सिलेंडर शिवाय आणखी काही संशयास्पद वस्तू मिळून येते का यासाठी एटीएसच्या पथकासह बॉम्ब स्कॉड यांनी श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण भंगार दुकानाची तपासणी करून तेथून काही नमुने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले नमुने हे तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाला पाठविण्यात आले आहे. फॉरेन्सिक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा स्फोट नक्की कसला होता हे उघड होईल असे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. एनआयएच्या हिटलिस्टवर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि पडघा नेहमी राहिले आहे. मुस्लिम बहुल इलाका म्हणून या दोन शहरांची ओळख आहे. एनआयए (NIA) (National Investigation Agency) ने नुकतीच पडघ्यातुन पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी (Pune ISIS module case) जुल्फिकार, अकिल नाचन, शमी नाचन यांना अटक केली आहे. तसेच मुंब्रा येथे एनआयए कडून सर्च ऑपरेशन राबविले गेले होते. (Mumbra Blast)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community