Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातील मजुरांशी मानसोपचारतज्ज्ञांचा संवाद, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा…मदतकार्याविषयी वाचा सविस्तर

मजुरांना व्यवस्थित आहार दिला जात आहे.

121
Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातील मजुरांशी मानसोपचारतज्ज्ञांचा संवाद, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा...मदतकार्याविषयी वाचा सविस्तर
Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातील मजुरांशी मानसोपचारतज्ज्ञांचा संवाद, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा...मदतकार्याविषयी वाचा सविस्तर

उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel Rescue) अडकलेल्या मजुरांना धीर देण्यासाठी तुम्ही निराश होऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा भाषेत मजुरांना सकारात्मक राहण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडून धीर दिला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मानसोपचार तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत.

बोगद्याच्या कोसळलेल्या ढिगाऱ्यापलीकडील २ किलोमीटरच्या पट्ट्यात हे मजूर अडकले असून एका पाईपमधून पाठविलेल्या माईकद्वारे मजुरांशी संवाद साधला जात आहे. खोदकामातील अडथळ्यांमुळे बचाव मोहीम लांबत आहे. त्यामुळे, मजुरांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ त्यांचे समुपदेशन करत असल्याची माहिती साबा अहमद या मजुराचा भाऊ नैय्यर अहमदने ‘पीटीआय’शी बोलताना दिली.

(हेही वाचा – Israel-Hamas conflict: इस्रायल-हमास युद्धबंदीचा कालावधी वाढला, ओलिसांच्या चौथ्या देवाणघेवाणीची तयारी)

संवाद साधण्याची मुभा
साबा बरोबरच इतर सर्व मजुरांशी घटनास्थळी उपस्थित असलेले डॉक्टरांचे पथक सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ दरम्यान दिवसातून दोन वेळा संवाद साधत आहे. त्याचप्रमाणे, मजुरांच्या कुटुंबीयांना दिवसभरातून केव्हाही त्यांच्याशी संवाद साधण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रशासनाने बोगद्याबाहेर मजुरांच्या कुटुंबीयांसाठीही मदत छावणी उभारली आहे.

चित्रपट पाहण्यासाठी, व्हिडिओ गेम खेळण्यासाठी मोबाईल
डॉ. प्रेम पोखरियाल म्हणाले की, या मजुरांना सुरुवातीला ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्स दिले जात होते. मात्र, आता त्यांना व्यवस्थित आहार दिला जात आहे. त्यात उकडलेली अंडी, चहा, डाळभात, चपातीभाजी आदींचा समावेश आहे. तसेच त्यांना टूथपेस्ट, ब्रश, टॉवेल, चित्रपट पाहण्यासाठी, व्हिडिओ गेम खेळण्यासाठी मोबाईल दिले जात आहेत.

घटनास्थळावर वैद्यकीय पथक
घटनास्थळावर वैद्यकीय पथक उपस्थित असून बचावकार्य सुरू असेपर्यंत गरज भासल्यास उत्तरकाशी आणखी १० डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवले आहे. मानसोपचारतज्ज्ञ व डॉक्टर मजुरांच्या कुटुंबीयांच्याही सातत्याने संपर्कात असून मजुरांच्या मनावर नकारात्मक परिणाम होईल, असे न बोलण्यासाठीही कुटुंबीयांचे समुपदेशन केले जात आहे, अशी माहिती नोडाल अधिकारी डॉ. विमलेश जोशी यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.