-
ऋजुता लुकतुके
नवीन शहरात एका माणसाचा पत्ता लिहायला चुकला. पण, त्यामुळे स्विगीच्या डिलिव्हरी करणाऱ्या माणसाला १२ किमीचा लांबचा फेरा पडला. पण, अशावेळी त्याने केलेलं कृत्य माणुसकी दाखवणारं होतं. (Swiggy Delivery Man)
नवीन शहरात गोष्टी अंगवळणी पडायला सगळ्यांना थोडा वेळ लागतोच. अशातच एका व्यक्ती स्विगी ॲपवर जेवण मागवताना चुकीचा पत्ता दिला. पण, डिलिव्हरी करणाऱ्या माणसाने त्याची अडचण समजून घेऊन १२ किमींचा अतिरिक्त प्रवास केला आणि रात्री तीन वाजता त्या व्यक्तीला जेवण घरपोच दिलं. हा प्रसंग अलीकडेच हैद्राबद इथं घडलेला आहे. (Swiggy Delivery Man)
तमाल साहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नेमकं काय घडलं ते लिहिलं आहे. तमाल यांना रात्री तीन वाजता त्यांनी मागवलेलं जेवणाचं पार्सल मिळालं. त्यांच्याही भावना अनावर झाल्या आणि त्यांनी तातडीने ट्विटरवर झालेला प्रसंग लिहिला. (Swiggy Delivery Man)
‘दिवसभर काम केल्यानंतर रात्री उशिरा घरी आलो तेव्हा जवळपासची हॉटेल बंद झाली होती. मी स्विगीवरून जेवण मागवलं. पण, शहरात नवीन असल्याने चुकीचा पत्ता पडला. पण, डिलिव्हरी करणाऱ्या माणसाने माझी अडचण ओळखून १२ किलोमीटर अतिरिक्त प्रवास करून माझं जेवण माझ्यापर्यंत पोहोचवलं. आता रात्रीचे तीन वाजत आहेत,’ असं तमाल यांनी लिहिलं आहे आणि सोबत नकाशाही जोडला आहे. (Swiggy Delivery Man)
Came back to hotel very late after a long day. All restaurants were shut so ordered food on @Swiggy . Since I don’t know much about #Hyderabad , the location went wrong. But the delivery agent took all the trouble, rode 12 kms to find me and deliver the food, now at 3am. I had… pic.twitter.com/ffDhipgM27
— Tamal Saha (@Tamal0401) November 25, 2023
(हेही वाचा – Mumbra Blast : मुंब्र्यातील स्फोटातून संशयाचा धूर; स्फोट नक्की कसला? शोधण्यासाठी नमुने फॉरेन्सिक विभागाकडे)
त्या डिलिव्हरी एजंटचं नाव महम्मद आझम असं होतं आणि तमाल यांनी दिवसभर काही खाल्लेलं नाही हे कळल्यावर त्याने १२ किलोमीटरचा पल्ला पार करून नेमक्या पत्त्यावर जेवण पोहोचवलं. तमाल यांनी सह्रदयतेची परतफेड म्हणून आझम यांना बरोबर जेवण्याचं आमंत्रण दिलं. यावर आझम यांनी ते नाकारून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती तमाल यांना केली. (Swiggy Delivery Man)
‘माणसांमधील माणूसकी अजून संपलेली नाही, यावर माझा पुन्हा एकदा विश्वास बसला. मोहम्मद आझम फोटोसाठी लाजत होता. म्हणून फोटो काढता आला नाही. पण, एका सह्रदय व्यक्तीशी आज भेट झाली,’ असंही तमाल यांनी संदेशात लिहिलं आहे. हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं. आणि १,१३,००० पेक्षा जास्त लोकांनी ते पाहिलं आहे. तर हजारोंनी लाईक केलं आहे. (Swiggy Delivery Man)
अनोळखी माणसाकडून अशी काळजी घेतली जाते तेव्हा माणुसकीचा खरा अर्थ कळतो, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. (Swiggy Delivery Man)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community