कोरोनाच्या चाचण्या करताय, योग्य प्रमाण समजून घ्या! 

कोरोना चाचण्या केल्यावर आपल्याला कोरोना झाला आहे का, इथपासून झाला असेल तर किती प्रमाणात झाला आहे, फुफ्फुसाला किती संसर्ग झाला आहे, रुग्णालयात दाखल व्हावे का, असे प्रश्न सर्वांनाच सतावत असतात, त्यांच्यासाठी उपयुक्त माहिती. 

179

काही काळ विसर पडलेला कोरोना मागील २ महिन्यांपासून पुन्हा चर्चेत आला. त्यामुळे अनेकजण नव्याने माहिती जमा करू लागले आहेत. यासंबंधी चाचण्या कोणत्या करायच्या, त्यांचे अहवाल आल्यावर प्रमाण कसे ओळखायचे? एचआरसीटी स्कोर म्हणजे काय? या प्रश्नांची माहिती अनेकजण शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

रक्तदाब तपासणी 

  • 120 / 80 –  चांगले (Normal)
  • 130 / 85 –  नियंत्रणात (Control)
  • 140 / 90 –  जरा वाढलेला (High)
  • 150 / 95 –  खूपच जास्त (Very High)

ऑक्सिजन पातळी चाचणी

  • 94 – चांगले (Normal)
  • 95, 96, 97  ते 100 – उत्तम (very good)
  • 90 ते 93 – जरा कमी (Bad)
  • 80 ते 89 – चिंताजनक, तत्काळ रुग्णालयात दाखल होणे (dangerous require to admit)

हृदयाचे ठोके तपासणी 

  • 72 प्रती मिनीट –  खूप चांगले (Standard)
  • 60 – 80 –  मध्यम (Normal)
  • 90 ते 120 – वाढली (High)

ताप तपासण्याची चाचणी 

  • 92 ते 98.6 F – ताप नाही  (Normal)
  • 99.0 F –  ताप थोडा (Temperature)
  • 100 .F – 102 F –  ताप जास्त (Temperature High)

छातीचा CT SCAN (HRCT)

या चाचणीने कोरोनाचा संसर्ग किती झाला हे कळते.

  • 0 – 8 सौम्य (Mild Infection)
  • 9 – 18 मध्यम (Moderate Infection)
  • 19 – 25 गंभीर (Severe Infection)
  • कोरोनावरील उपचार सौम्य आणि मध्यम संसर्ग गोळ्या, औषधांनी बरा होऊ शकतो.
  • गंभीर इन्फेक्शनला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासते.

HRCT Score म्हणजे काय ?

  • कोरोना इन्फेक्शनमुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषणाऱ्या पिशव्यांना सूज येऊन त्यात पाणी / कफ भरतो.
  • छातीचा CT SCAN करताना फुफ्फुसाचे 25 भाग करून त्या पैकी किती भाग संसर्गाने व्यापलेला आहे हे पाहून त्याचा SCORE काढतात.
  • अर्थात जितका SCORE जास्त तितका ऑक्सिजन घ्यायला त्रास जास्त म्हणून रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी आणि पर्यायाने धोका जास्त.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.