संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यातील पहिले ५ मजूर सुखरूप बाहेर आले आहेत. (Uttarkashi Tunnel Rescue) गेल्या 17 दिवसांपासून या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न चालू होते. अनेक अत्याधुनिक पर्याय वापरून झाल्यानंतर शेवटी बोगदा हातानेच खोदून एका पाईपमधून कामगारांना बाहेर काढण्यात आले. बोगद्याच्या आत 800 मिमी व्यासाचा पाईप टाकण्यात आला आहे. एनडीआरएफच्या (NDRF) टीमने कामगारांना पाईपमधून बाहेर काढले.
(हेही वाचा – Shreyas Iyer Gifts India Jersey : श्रेयस अय्यर जेव्हा भारतीय जर्सी फॉर्म्युला वन स्टार मॅक्स फेअरस्टेपनला भेट देतो)
मुख्यमंत्री धामी बचावकार्यस्थळी उपस्थित
Uttarakhand चे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) आणि केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह (VK Sinh) बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. ते संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. पुष्कर सिंह धामी यांनी ‘एक्स’ या प्लॅटफाॅर्मवर याविषयी पोस्ट केली आहे.
बाबा बौख नाग जी की असीम कृपा, करोड़ों देशवासियों की प्रार्थना एवं रेस्क्यू ऑपरेशन में लगे सभी बचाव दलों के अथक परिश्रम के फलस्वरूप श्रमिकों को बाहर निकालने के लिए टनल में पाइप डालने का कार्य पूरा हो चुका है। शीघ्र ही सभी श्रमिक भाइयों को बाहर निकाल लिया जाएगा।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) November 28, 2023
एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. अडचणीच्या प्रसंगांसाठी सैन्यालाही पाचारण करण्यात आले आहे. कामगारांना बोगद्यातून बाहेर काढताच त्यांची पहिली वैद्यकीय तपासणी केली जाईल. कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपले हेवीवेट चिनूक हेलिकॉप्टरही बचाव स्थळी तैनात केले आहे.
(हेही वाचा – Shinde Govt: सुप्रिम कोर्टाचा शिंदे सरकारला दिलासा, एनजीटीच्या १२ हजार कोटींच्या दंडाच्या आदेशाला स्थगिती)
मॅन्युअल ड्रिलिंगवर लक्ष
कामगारांना बाहेर काढण्यासाठी हाय-टेक ऑपरेशनबरोबरच पारंपरिक बचाव उपायांचीही अंमलबजावणी केली गेली. बचावकार्याच्या 17व्या दिवशी पावसाने काही काळ व्यत्यय आणला होता. पण त्यानंतर हवामानात बदल झाला. मायक्रो-टनेल तज्ज्ञ ख्रिस कूपर याविषयी म्हणाले, “आम्ही मॅन्युअल ड्रिलिंगवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की, परिणाम आमच्या बाजूने असतील.”
सर्वांचा जीव मौल्यवान – लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी सांगितले की, बोगद्याच्या 58 मीटर अंतरावर उत्खनन करण्यात आले आहे. यासाठी रात्रभर हाताने उत्खनन करण्यात आले आणि तेथून अवशेष बाहेर काढण्यात आले. बचाव कार्यात अनेक अडथळे आले आहेत. आम्ही 400 तासांपेक्षा जास्त काळ या मोहिमेत गुंतलो आहोत. आमच्यासाठी, आत अडकलेल्या आणि ऑपरेशनमध्ये गुंतलेल्या सर्वांचा जीव मौल्यवान आहे.
(हेही वाचा – Mumbra Blast : मुंब्र्यातील स्फोटातून संशयाचा धूर; स्फोट नक्की कसला? शोधण्यासाठी नमुने फॉरेन्सिक विभागाकडे)
बोगद्याच्या आत वैद्यकीय सुविधा
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना (workers stuck in tunnel) तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी बोगद्याच्या आत वैद्यकीय सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे. कामगारांना बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर कामगारांना येथे काही काळ ठेवले जाईल. कोणत्याही कामगारामध्ये आरोग्याची कोणतीही अडचण आढळल्यास त्वरित उपचार करण्यासाठी बोगद्यात 8 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉक्टरांसोबतच ऑक्सिजन आणि औषधांचीही तिथे व्यवस्था करण्यात आली आहे. (Uttarkashi Tunnel Rescue)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community