MP Assembly Election : मध्यप्रदेशातील सरकारसाठी बसपा ‘डील’ करणार

मध्यप्रदेशात सत्तेचा मुकाबला भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात असला तरी बहुजन समाज पक्ष सुध्दा गुडघ्याला बाशिंग बांधून बसला आहे.

153
MP Assembly Election : मध्यप्रदेशातील सरकारसाठी बसपा 'डील' करणार
MP Assembly Election : मध्यप्रदेशातील सरकारसाठी बसपा 'डील' करणार

मध्यप्रदेशात सत्तेचा मुकाबला भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात असला तरी बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) सुध्दा गुडघ्याला बाशिंग बांधून बसला आहे. बसपा (BSP) सरकार स्थापनेत मोलाची भूमिका बजावणार आहे आणि संधी मिळाली तर सत्तेतही सहभागी होऊ असा दावा बसपाकडून केला जात आहे. (MP Assembly Election)

सविस्तर वृत्त असे की, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) आणि कॉंग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांतील प्रभावशील बंडखोरांना मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (Bahujan Samaj Party) आपल्या तिकीटवर निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. बसपाने तब्बल १८३ जागा लढविल्या होत्या. यातील किमान २५ जागांवर विजय मिळणार अशी आशा बसपाला आहे. (MP Assembly Election)

मायावती यांचा अंदाज खरा ठरला आणि बसपा (BSP) मध्यप्रदेशात तिसरा मोठा पक्ष म्हणून उदयास आला तर कॉंग्रेससोबत मोठी ‘डील’ केली जाऊ शकते, असे बसपच्या नेत्यांना वाटू लागले आहे. ही ‘डील’ लोकसभेच्या निवडणुकीत आघाडी करण्याच्या दृष्टीकोनातून होऊ शकते. मध्यप्रदेशातील विध्यांचल आणि उत्तरप्रदेशातील बुंदेलखंड या भागात बसपाचा चांगला प्रभाव आहे, हे येथे उल्लेखनीय. (MP Assembly Election)

मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत बसपाने (BSP) गोंडवाना रिपब्लिक पक्षाशी आघाडी केली होती. बसपाने १८३ तर गोंडवाना पक्षाने ४५ उमेदवार मैदानात उतरविले होते. यापूर्वी, बसपाचे ११ आमदार निवडून आले होते. २०१८ च्या निवडणुकीत फक्त दोन आमदार निवडून आले आणि ६.४२ टक्के मते मिळाली होती. मात्र, गोंडवाना रिपब्लिक पक्षाशी आघाडी करून मैदानात उतरल्यामुळे बसपाला यावेळी चांगला परफॉर्मन्स होण्याची आशा आहे. (MP Assembly Election)

यात किंचितही दुमत नाही की, सत्तेचा मुख्य मुकाबला भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमध्येच (Congress) आहे. परंतु, बसपाच्या उत्साहामार्ग २०१८ चा निकाल आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत बसपा आणि गोरिपाचे ९० उमेदवार असे होते जे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. आता या दोन्ही पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढविली आहे. याशिवाय, बसपाने भाजप आणि कॉंग्रेसमधील प्रभावशाली नेत्यांना तिकीट दिले होते. (MP Assembly Election)

(हेही वाचा – Shinde Govt: सुप्रिम कोर्टाचा शिंदे सरकारला दिलासा, एनजीटीच्या १२ हजार कोटींच्या दंडाच्या आदेशाला स्थगिती)

अशात, बसपाला (BSP) किमान २५ जागा जिंकण्याची आशा आहे. भाजप (BJP) किंवा कॉंग्रेसला (Congress) पूर्ण बहुमत नाही मिळाले आणि बसपाने दहा-पंधरा जागा जिंकल्या तर कोणत्याही पक्षाला बसपाची मदत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही. अशात चांगली ‘डील’ करता येईल असे बसपाला वाटू लागले आहे. एवढेच नव्हे तर, हे चित्र डोळ्यापुढे ठेऊन रणनिती आखली जात आहे. (MP Assembly Election)

अशातच, भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांनी बसपावर शरसंधाण साधले आहे. बसपाचे उमेदवार भाजप (BJP) किंवा कॉंग्रेसच्या (Congress) उमेदवारांच्या पराभवाचे कारण ठरू शकतात. परंतु, स्वत: जिंकून येण्याच्या स्थितीत नाहीत, असे मत भाजपने व्यक्त केले आहे. तर, बसपाचे स्वप्न ३ डिसेंबरपर्यंतच जिवंत राहणार असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. (MP Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.