गेल्या आठवड्याभरापासून दूध उत्पादक शेतकरी अकोल्यात (Akola) बेमुदत उपोषणास बसले आहेत. आता त्यांच्यासमवेत शेतकरी नेते अजित नवले (Ajit Navale) हेही उपोषणाला बसले आहेत. दुधाला ३४ रुपये दर (Milk Rates) मिळावा, या मागणीसाठी हे उपोषण केले जात आहे. राज्य सरकारने आदेश देऊनही दूध संघांनी (Dudh Sangh) हा दर देण्यास नकार दिल्यामुळे हा प्रश्न चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘एक्स’वरील (twitter) त्यांच्या अधिकृत हँडलवर खुले पत्र शेअर केले आहे.
(हेही वाचा – MP Assembly Election : मध्यप्रदेशातील सरकारसाठी बसपा ‘डील’ करणार)
शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक
शरद पवारांनी या पत्राच्या माध्यमातून दूध दराबाबत शासनाने तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. “महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Govt) १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला (Cow Milk) किमान ३४ रुपये प्रति लिटर निश्चित करूनही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही, असे दिसते. या संदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे”, असे या पत्रात शरद पवारांनी नमूद केले आहे.
आवाहन
गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांची बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर निश्चित करूनही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे… pic.twitter.com/aGi0kRGr58
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2023
मुख्यमंत्र्यांना विनंती
शरद पवार यांनी दूधदराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनाही विनंती केली आहे. “उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांना देखील विनंती आहे की, त्यांनी दूधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीची (Milk Rates) अंमलबजावणी करून घ्यावी”, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community