Marathi Sign Boards : महापालिकेने तपासल्या मुंबईतील ३ हजार दुकानांच्या पाट्या; १७६ दुकानांवर कारवाई

BMC : दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दिलेली २ महिन्यांची मुदत २५ नोव्‍हेंबर रोजी संपुष्टात

124
Marathi Sign Boards : महापालिकेने तपासल्या मुंबईतील ३ हजार दुकानांच्या पाट्या; १७६ दुकानांवर कारवाई
Marathi Sign Boards : महापालिकेने तपासल्या मुंबईतील ३ हजार दुकानांच्या पाट्या; १७६ दुकानांवर कारवाई

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिकाक्षेत्रातील (BMC) दुकाने व आस्थापनांवर मराठीत ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक आहे. (Marathi Sign Boards) या निर्देशांची अंमलबजावणी होते का, याची तपासणी करण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या २४ प्रशासकीय विभागांतील पथकांनी मंगळवार, २८ नोव्हेंबर रोजी ३ हजार २६९ दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्‍या. मराठी नामफलकांची तपासणी केली. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरांत ३ हजार ९३ नामफलक आढळले. तर सर्वोच्च न्यायालयाच्या (SUPREME COURT OF INDIA) आदेशाचे पालन न केलेल्या १७६ दुकाने व आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Rescue : अखेर ‘ते’ मजूर मृत्यूच्या दाढेतून बाहेर; उत्तरकाशीतील बोगद्यात प्रयत्नांना मोठे यश)

महापालिका आयुक्‍त आणि उप आयुक्‍त यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन

मुंबईतील सर्व दुकाने आणि आस्थापने यांच्यावर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत, ठळक अशा प्रकारचे नामफलक लावण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी व्यापक बैठक घेऊन सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि उप आयुक्‍त (विशेष) संजोग कबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करण्यात आले आहे. त्‍यांना कारवाईचे अधिकार देण्‍यात आले आहेत.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२ च्या अनुक्रमे नियम ३५ व कलम ३६ क च्या तरतुदींनुसार आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. (Marathi Sign Boards)

(हेही वाचा – Jasprit Bumrah Silence Post : जसप्रीत बुमराच्या ‘या’ इन्स्टा पोस्टने क्रिकेटमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण)

सर्वोच्च न्यायालयाची मुदत २५ नोव्‍हेंबरला संपुष्टात

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार, दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरांत लावण्याबाबत २ महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत शुक्रवार दिनांक २५ नोव्‍हेंबर २०२३ रोजी संपुष्टात आली. तथापि, साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटी असल्याने नामफलकाबाबतची तपासणी कारवाई मंगळवार, २८ नोव्‍हेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे.

एकाच दिवशी ३ हजार २६९ दुकानांची तपासणी

पालिकेच्या पथकांने एकाच दिवशी ३ हजार २६९ दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्‍या. (Mumbai) तसेच, मराठी नामफलकांची तपासणी केली. या तपासणीत मराठी देवनागरी लिपित, ठळक अक्षरात ३ हजार ९३ नामफलक आढळले. तसेच, १७६ दुकाने व आस्थापनांनी अधिनियमांची तरतूद व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यानुसार नामफलक मराठी भाषेत देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावले नसल्याने अशा दुकाने व आस्थापनांवर अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायालयीन कार्यवाही करण्यात आली, असे महानगरपालिकेच्‍या वतीने कळविण्‍यात येत आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख पद नाही; शिंदे गटाचा युक्तिवाद)

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि कायद्यातील तरतुदी यांचा भंग करणाऱ्यांना सर्वप्रथम तपासणी पत्र सोपवण्यात येईल. माननीय न्यायालयाकडून या दोषी दुकाने अथवा आस्थापनांमध्ये कार्यरत प्रति व्यक्ती रुपये दोन हजार याप्रमाणे आणि जास्तीत जास्त रुपये एक लाख या मर्यादेत दंड केला जाईल.

… तर प्रतिदिन दोन हजार रुपये दंड

तसेच, सातत्याने नियमभंग केला आहे, असे आढळले तर, प्रतिदिन रुपये दोन हजार प्रमाणे दुकानदार व आस्थापनांवर आर्थिक दंड होऊ शकेल, असेही महानगरपालिकेच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. (Marathi Sign Boards)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.