Raj Thackeray : बाळासाहेबांचे विचार असे म्हणता, मग मराठी पाट्या आणि मशिदींवरील भोंग्यावर का निर्णय होत नाही; राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

105

राज्य सरकार सारखे सारखे बाळासाहेबांचे विचार असे म्हणत असते, मग दुकानावरील मराठी पाट्यांसाठीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर का अंमलबजावणी करत नाही, तसेच मशिदींवरील भोंगे का उतरवत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला सुनावले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. शहरातील पाषाण भागात मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत बाबू वागसकर, किशोर शिंदे, वसंत मोरे उपस्थित होते.

(हेही वाचा Bihar School Holidays 2024 : बिहारमधील शाळांच्या हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द; ऊर्दू शाळांची साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी)

काय म्हणाले राज ठाकरे? 

जर सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही संबंधित लोक ऐकत नसतील तर सरकारचा धाक आहे की नाही? न्यायालयाची भीती वाटते की नाही? असे जर असेल तर आपण अराजकतेकडे चाललोय, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. त्याचवेळी ड्रग्जमधूनन मिळणाऱ्या पैशावरच सगळ्यांचे चाललेय की काय? त्यामुळेच कारवाई होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील प्रश्न विचारला असता उत्तर न देताच राज ठाकरे निघून गेले. सरकारने आरक्षणाचा शब्द पाळला नाही तर ख्रिसमस दरम्यान मुंबईत मोर्चा काढू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यावर ते काय सांताक्लॉज आहेत काय? अशी खिल्ली राज ठाकरे यांनी मागील आठवड्यात उडवली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.